संजय राऊत यांचा संशय खरा की खोटा? गिरीजा राऊत यांच्या वकिलाने थेटच…

Girija Raut allegation on Vinayak And Gitesh Raut: माजी खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादळ चव्हाट्यावर आले आहे. त्यांची सून गिरिजा राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान यावेळी संजय राऊतांच्या त्या संशयालाही उत्तर देण्यात आले आहे.

संजय राऊत यांचा संशय खरा की खोटा? गिरीजा राऊत यांच्या वकिलाने थेटच…
विनायक राऊत, गितेश राऊत, गिरिजा राऊत
| Updated on: Jul 12, 2026 | 12:50 PM

Girija Raut allegation on Vinayak And Gitesh Raut: ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या घराताली वाद चव्हाट्यावर आल्याने आणि सूनेने जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनायक राऊत आणि दुसरीकडे गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेंकावर गंभीर आरोप केले. विनायक राऊत आणि गितेश राऊत या पिता-पुत्रावर ठाण्यात गुन्हा दाखल झाला हेच संशयास्पद असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. गुन्हा ठाण्यातच का नोंदवण्यात आला? राजकीय दबाव होता का? या प्रश्नावर गिरिजा राऊतांच्या वकिलांनी थेट उत्तर दिले आहे.

गिरिजा राऊत यांचे गंभीर आरोप

Loading...

2016-17 मध्ये गिरिजा राऊत आणि गितेश राऊत यांचं लग्न झाले. पण शारिरीक संबंध झाले नाहीत. 2018 पासून दोघांमध्ये काहीच शारीरिक संबंध आले नाहीत.गणपती नंतर बाळासाठी प्रयत्न करू असे सांगितले. पण नंतर मुल होण्यासाठी अघोरी प्रकार, अघोरी कृत्य करण्यात आले. वेगवेगळ्या गोळ्या देण्यात आल्या. डोक्यावरचे केस काढण्यात आले. जिवंत कोंबडी अंगावरून ओवळण्यात आली. विशिष्ट पेय देण्यात आली. गोमूत्र देण्यात आले असे एकामागून एक आरोप गिरिजा राऊतांनी गितेश आणि कुटुंबियांवर केले. त्यात राजकीय दबाव जास्त असल्यापेक्षा मानसिक दबाव जास्त होता. माझं आयुष्य नॉर्मल नव्हतं, असे गिरिजा राऊतांचे म्हणणे आहे.

विनायक राऊत हे कधीच आमच्या सोबत राहत नव्हते. आम्ही चाळीतीतलं घरी राहायचो. ते दुसर्‍या बायको सोबत राहायचे. आणि नवरात्री च्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी ते यायचे. मी त्या ठिकाणी सात वर्षे होते पण त्या ठिकाणी मी कधीच असं केलं नाही. आरोप अथवा गुन्हे दाखल केले नाही. मला जर त्यांच्या कडून पैसे घ्याचे असते ते कधीच केले असते, मग आताच तसे का करू असा सवाल गिरिजा राऊत यांनी विनायक राऊतांच्या आरोपांवर केला.

ठाण्यातच गुन्हा का दाखल केला?

विनायक राऊत आणि गितेश राऊत या पिता-पुत्रावर ठाण्यात गुन्हा दाखल झाला हेच संशयास्पद असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. 498 च्या प्रकरणात फिर्यादी जिथे राहते. तिथे गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत. तिच्यावर दबावाची प्रक्रिया सुरूच होती. फिर्यादी या ठाणे न्यायालयीन क्षेत्रात राहत असल्याने कायद्याने त्यांना ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असल्याची माहिती गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम यांनी दिली.

विनायक राऊतांसह मुलाला अटक झाली पाहिजे

गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम यांनी विनायक राऊत यांच्यासह मुलाला अटक करण्याची मागणी केली. महाराष्ट्र नरबळी आणि बाकीचे कायदे लागले पाहिजे. वेळोवेळी अघोरी कृत्य करण्यात आले आहे. त्यांच्यावर मानसिक दबाव येईल असं वागले आहेत. ते सध्या पावफूल असल्यामुळे त्यांना आवाज उठवता आला नाही. या प्रकरणात विनायक राउत यांना अटक झाली पाहिजे. सोबत जे कोणी आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे. यामध्ये सगळे कलम लावले आहेत ते आजमीन पात्र कलम आहेत. ठाणे या ठिकाणी असे अनेक केस रजिस्टर आहेत त्या साठी इथे गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us