हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही: सुभाष देसाई

मुंबई: हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसंच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील  जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्यातील खंडाळ्याहून अर्धनग्न आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतेली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सुभाष देसाई म्हणाले, खंडाळा टप्पा […]

हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही: सुभाष देसाई
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई: हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसंच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील  जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्यातील खंडाळ्याहून अर्धनग्न आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतेली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी सुभाष देसाई म्हणाले, खंडाळा टप्पा क्रमांक 1 मधील शिल्लक राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 15 टक्के परताव्याची जमीन खंडाळ टप्पा-2 मध्ये देण्यात येईल. तर खंडाळा टप्पा-2 मधील हरकत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार नाहीत.  बागायतीखालील  जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी देण्यात येतील. खंडाळा टप्पा-3 मधील ज्या जमिनी लाभक्षेत्राखालील आहेत, त्या जमिनी वगळण्यात येतील आणि या टप्प्यामधील ज्या जमिनी महामंडळाच्या ताब्यात आहेत, त्या  जमिनीला संलग्नता असलेले क्षेत्र संमतीने घेण्यात येईल.

खंडाळा औद्योगिक क्षेत्रामध्ये आतापर्यंत 3 हजार 926 रोजगारापैकी 2 हजार 489 रोजगार स्थानिक लोकांना देण्यात आलेले आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे अधिक स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येतील.  जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनासाठी झालेल्या विलंबाबाबत उद्योगमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.  या विलंबाबाबत संबधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची चौकशी करण्याची महसूलमंत्र्यांना विनंती करण्यात येईल असेही सुभाष देसाई म्हणाले.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीतील जमिनी  संदर्भात अनेक प्रलंबित  मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. आज उद्योगमंत्र्यांच्या भेटीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, असा दावा सुभाष देसाई यांनी केला.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात प्रमोद जाधव, सतीश कचदे, रवींद्र ढमाळ, आनंद ढमाळ, युवराज ढमाळ, दत्तात्रय हाके यांचा समावेश होता. यावेळी उद्योग विभागाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी आबा मिसाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरे, कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, वाईच्या उप विभागीय अधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले उपस्थित होते.

संबंधित बातम्या

साताऱ्यातील शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने अर्धनग्न मोर्चा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.