AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे फोटो बीडीडीच्या देव्हाऱ्यात, बीएमसी निवडणुकीत फायदा होणार का?

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील (Worli BDD Chawl Redevelopment) पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आला. या पुनर्विकासाचा फायदा शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत होणार का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे फोटो बीडीडीच्या देव्हाऱ्यात, बीएमसी निवडणुकीत फायदा होणार का?
बीडीडी चाळ पुनर्विकासाचा सेनेला फायदा किती
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 3:05 PM
Share

मुंबई : शिवसेना-भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणुकीकडे (BMC Election 2021) अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास सहा महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील (Worli BDD Chawl Redevelopment) पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आला. या पुनर्विकासाचा फायदा शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत होणार का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा मुंबईसाठी खूप महत्त्वाचा आहे. खूप वर्षांपासून तो प्रलंबित होता. तो आता मार्गी लागतोय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना, तसंच युवा नेते आदित्य ठाकरे वरळीच्या आमदारपदी असताना. त्याचा निश्चित फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला होणार आहे. कोकणात राहणाऱ्या बीडीडी चाळीतील रहिवाशांचे इतर प्रश्नही लवकर मार्गी लावणं महत्त्वाचं आहे.

भायखळा वगळता वरळी, नायगांव, दादर, माहिम हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. इतक्या वर्षांची शिवसेनेची मोर्चेबांधणी आहे, आणि या भागातील मतदारांचा शिवसेनेवर विश्वास आहे. परंपरागत मतदारांचे सेनेशी संबंध आहेत. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी नवं घर हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच होईल. मात्र एकाच मुद्द्यावरुन मतदार आपलं मत ठरवत नाहीत, हेही विसरता कामा नये.

– अभिमन्यू शितोळे, राजकीय पत्रकार, नवभारत टाइम्स

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हा बऱ्याच वर्षांपासून रेंगाळलेला आहे. अनेकदा प्रयत्न झाले, पण त्यावर तोडगा निघाला नव्हता. एसआरए प्रकल्प असो किंवा चाळींचा पुनर्विकास, या मुद्द्यांचा शिवसेनेला फायदा झाला होता. त्यामुळे बीडीडी पुनर्विकासाचा सेनेला निश्चित फायदा होणार. इथला मतदार हा महाविकास आघाडीतील घटक पक्षांचाच (शिवसेना-राष्ट्रवादी) आहे. रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लागतात, हा संदेश जाईल.

आतापर्यंत खासगी बिल्डरने पुनर्विकास केल्यावर स्थानिक रहिवाशांना काही मिळत नव्हतं. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं होतं. मुंबईतील अनुसूचित जाती-जमातींचा समाज हा आधीपासूनच शिवसेनेसोबत होता. रिपाइंला मानणाऱ्या वर्गाव्यतिरिक्त इतर समाज बांधवांचा सेनेला पाठिंबा होता. त्या भागात रिपाइंचा उमेदवार नसेल, तर त्याची मतं भाजपला ट्रान्सफर होणार नाहीत, तर शिवसेनेलाच जातील

– अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“आज भूमिपूजन केले, 36 महिन्याने आपण सगळे एकत्र चाव्या देऊ. आयुष्य काही-काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्रिपद स्वप्नात नव्हते. आता त्याच्या खोलात जात नाही, ते स्वीकारले. लहानपणापासून या परिसरात येणं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत यायचो. भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिले नाही. माझ्यावर लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका” असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रहिवाशांना दिला.

बीडीडी चाळीचा पुनर्विकास

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण (Nodal Agency) म्हणून नियुक्ती केली आहे. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी  बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.

 

संबंधित बातम्या :

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

(Will Shivsena get benefit of BDD Chawls redevelopment in Mumbai BMC election 2022)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.