वरळी कोळीवाडा सीलमुक्त होण्याच्या मार्गावर, कोळीवाड्याने करुन दाखवलं!

वरळी कोळीवाडा सीलमुक्त होण्याच्या मार्गावर, कोळीवाड्याने करुन दाखवलं!

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेला वरळी कोळीवाडा आता सीलमुक्त होण्याच्या (Worli Koliwada to be seal free) हालचाली सुरु आहेत.

सचिन पाटील

|

May 08, 2020 | 10:53 AM

मुंबई : कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेला वरळी कोळीवाडा आता सीलमुक्त करण्याच्या (Worli Koliwada to be seal free) हालचाली सुरु आहेत. मागील 10 ते 12 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण न आढळल्याने या भागातील कर्फ्यूचे निर्बंध लवकरच हटवले जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. याबाबत पोलीस आणि पालिका अधिकारी समन्वयाने आवश्यक तो निर्णय घेणार आहेत. (Worli Koliwada to be seal free)

जनता कॉलनीतही गेल्या 8 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोळीवाडापाठोपाठ जनता कॉलनीचेही अतिरिक्त निर्बंध काढले जाण्याची शक्यता. टप्प्या-टप्प्याने कोळीवाड्यातील सील हटवले जाणार आहेत. कर्फ्यूचे कडक निर्बंध हटवल्यास तब्बल 37 दिवसांनंतर वरळी कोळीवाडा सीलमुक्त होणार आहे.

वाचा : आदित्य ठाकरेंचा ‘वरळी पॅटर्न’ माझ्या मतदारसंघात राबवा, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

या भागात 29 मार्चला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये अनेकांनी कोरोनावर मात केली, तर काहींचा कोरोनाने बळी घेतला. कोळीवाड्यातील कोरोनाचा कहर पाहता तब्बल 200 पेक्षा अधिक जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मुंबईतील सर्वात पहिली मोठी कोरोनाबाधित वस्ती म्हणून वरळी कोळीवाडा सील करण्यात आला होता.

महापौरांची प्रतिक्रिया

“कोळीवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून नवा पेशंट सापडलेला नाही. त्यामुळे हा भाग मुक्त करत असलो, तरी काही बंधनं ठेवणारच आहोत. कारण कोरोना पुन्हा उफाळू शकतो, त्या अनुषंगाने काही बंधनं असतील, असा आमचा मानस आहे.

कोळीवाडा कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाचं यश आहेच, पण जास्त यश हे लोकांचं आहे. लोकांनी ऐकल्यामुळे हे शक्य झालं आहे. वरळी सीलमुक्त करत असलो तरी संचारबंदी ठेवणारच आहोत. आमचं सर्वांचं लक्ष तिकडे आहे”, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

आदित्य ठाकरेंचा ‘वरळी पॅटर्न’ माझ्या मतदारसंघात राबवा, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें