मोदी म्हणजे ‘सबके साथ, विश्वासघात’; युवक काँग्रेसची इंधन दरवाढीविरोधात राज्यभर निदर्शने

देशभरात वाढत चालेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. (Youth Congress Workers protest against fuel hike in all over maharashtra)

मोदी म्हणजे 'सबके साथ, विश्वासघात'; युवक काँग्रेसची इंधन दरवाढीविरोधात राज्यभर निदर्शने

मुंबई: देशभरात वाढत चालेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे सबके साथ, विश्वासघात असल्याचं सांगत युवक काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. (Youth Congress Workers protest against fuel hike in all over maharashtra)

सातत्याने  होत असलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ‘विश्वासघात आंदोलन’ करण्यात आले. हे आंदोलन राज्यव्यापी असून महाराष्ट्रात प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात हे आंदोलन एकाचवेळी घेण्यात आले. रोजच होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या या आंदोलनात सामान्य नागरिकांचा उस्फुर्त सहभाग दिसून  आला.

‘विश्वासघात आंदोलन’

अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मीरा भाईंदर शहराच्या दौऱ्यात स्थानिक कलाकार व साहित्यिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. याचवेळी त्यांनी मिरारोड भाईंदर शहराचे ‘विश्वासघात आंदोलनाचे’ नेतृत्व करताना केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार टीका केली. “सबका साथ, सबका विकास चा नारा देऊन मोदींनी  २०१९ साली दुसऱ्यांदा सत्ता हातात घेतली. इंधन आणि घरगुती गॅसचे दर कमी होतील हेही आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु, सत्तेवर आल्यापासून सतत इंधनाचे दर वाढवले. इतर बाबतीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासघात केला म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने याविरोधात विश्वासघात आंदोलन केले, असं तांबे म्हणाले.

आधी वापरायचं नंतर विश्वासघात करायचा

मोदींनी सत्तेत येण्यासाठी  प्रत्येक वर्गाला आश्वासने देऊन त्यांची मते घेतली आणि सत्तेत आल्यावर मात्र विश्वासघात केला. पहिल्यांदा वापरून घ्यायचं आणि नंतर विश्वासघात करायचा, ही मोदींची जुनी सवय आहे. मोदी हे आता सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे ऐकून सुद्धा घेत नाही. म्हणूनच महाराष्ट्र युवक काँग्रेसला रस्त्यावर यायची गरज पडली, असंही ते म्हणाले.

कराडमध्ये केंद्र सरकार विरोधात निदर्शने

वाढत्या गॅस पेट्रोल-डिझेलच्या किंमती विरोधात कराडमध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आल. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील गांधी पुतळ्या समोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. कोरोनामुळे जनता आधीच मेतकुटीला आली असून मोदी सरकारकडून वारंवार पेट्रोल-डिझेल दरवाढ होत आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेस राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिली. (Youth Congress Workers protest against fuel hike in all over maharashtra)

औरंगाबादच्या क्रांती चौकात एल्गार

युथ काँग्रेसने आज औरंगाबादच्या क्रांती चौकात इंधन दरवाढी विरोधात जोरदार निदर्शने केली. पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. मोदी म्हणाले होते, अच्छे दिन आयेंगे, परंतु अच्छे दिन आले नसून मोदी सरकारने जनतेचा विश्वास घात केला आहे, अशी टीका युवक काँग्रेसने केली. अशीच भाव वाढ होत राहिली तर युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. (Youth Congress Workers protest against fuel hike in all over maharashtra)

 

संबंधित बातम्या:

आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ, अक्षय गप्प का?; नाना पटोलेंचा सवाल

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत, लॉकडाऊन लागणार? महापौर मोहोळ म्हणतात…

Video: पुजा अरुण राठोडच्या गर्भपाताबद्दल ‘त्या’ डॉक्टरचं म्हणणं काय? Exclusive

(Youth Congress Workers protest against fuel hike in all over maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI