AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती, नागरिकांकडून आंदोलन मागे

स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केल्यानंतर सध्या मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी ही माहिती दिल्यानंतर स्थानिकांचे आंदोलनही तूर्तास मागे घेण्यात आलं आहे.

एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती, नागरिकांकडून आंदोलन मागे
एल्फिन्स्टन ब्रीज
| Updated on: Apr 26, 2025 | 7:34 AM
Share

मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीजच्या तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिली आहे. तोडकामाला स्थगिती देण्याचा निर्णय समोर आल्यानंतर यासंदर्भात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांकडून तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. याप्रकरणी सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात येईल असं एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

काल, शुक्रवार 25 एप्रिलला एमएमआरडीएने एल्फिन्स्टन ब्रीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे. पुढचे दोन दिवस म्हणजेच सोमवारपर्यंत हा ब्रीज सुरू राहणार असल्याचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं. त्यामुले स्थानिकांचे आंदोलन तूर्तास थांबलं आहे. सोमवारी आता यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल.

काल ब्रीज बंद करून आजपासून पाडकाम करण्याचा निर्णय घेतल्यावर संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मोठमोठाले जेसीबी दाखल झाले, पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. ब्रीजचाा डिव्हायर तोडण्याचंही काम सुरू झालं होतं. मात्र ब्रीज बंद करण्याच्या निर्णयाविरोधात प्रभादेवी-परळमधील स्थानिक नागरीक रस्त्यावर उतरले होते. ते रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते. हा निर्णय मागे घेण्याची मागणीदेखील करण्यात येत होती. एल्फिन्स्टन ब्रीज तोडल्याने आजूबाजूचे जे नागरिक आहेत, जे बाधित होणार आहेत , त्यांनी आधी आमचं पुनर्वसन करा, अशी मागणी केली होती. काल रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर त्यांचं आंदोलन सुरूच होतं. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर कालिदास कोलंबकर यांनी हा निर्णय दोन दिवसांसाठी स्थगित करणार येणार असल्याचे सांगितलं. दोन दिवसांनंतर सोमवारी बैठक घेऊन, त्यावर पुढचा निर्णय घेण्यात येईल असं नमूद करण्यात आलं. त्यानंतर नागरिकांचे आंदोलनही तूर्तास थांबवण्यात आलं आहे.

का होतोय विरोध ?

शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूला – वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी वरळी कनेक्टरचे काम लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी तेथे डबल डेकर ब्रीज बांधण्यात येणार आहे. पण तेथे पिलर उभा करण्यासाठी एल्फिन्स्टन रोडवरील इमारती रिकाम्या करण्याचेय आदेश एमएमआरडीएने दिल होते. या विभागातील 19 इमारतींना नोटीस देण्यात आली. त्या इमारती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यामुळे नागरिक संतापले आणि रस्त्यावर उतरले. ब्रीज तोडण्याचे काम सुरू करण्यापूर्वी आधी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी करत स्थानिक नागरिकांनी काल रात्री उशीरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं होतं. आता मुख्यमंत्री कार्यालायतून फोन आल्यावर दोन दिवसांसाठी तरी पुलाच्या पाडकामाला स्थगिती देण्यात आली असून सध्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. दोन दिवसांनी बैठकीत काय निर्णय होईल, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!