कोल्हापुरातल्या गार्डनमध्ये अचानक वाढली टक्कलग्रस्तांची गर्दी, समोरचं दृष्य पाहाताच अधिकारी हादरले!
गेल्या आठ दिवसांपासून हा सगळा प्रकार चालू होता. शहरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्त गर्दी करत होते. अखेर या प्रकरणाची दखल आता महापालिकेकडून घेण्यात आली आहे.

कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्त गर्दी करत होते. या गार्डमध्ये सलमान नावाचा व्यक्ती या टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्याला आयुर्वेदिक तेल लावत होता. हे तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र गर्दी प्रचंड प्रमाणात वाढल्यानं अखेर आठ दिवसांनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमानवर महापालिकेकडून अखेर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा व्यक्ती कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्याला आयुर्वेदिक तेल लावत होता. सलमानचं हे आयुर्वेदिक तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी महावीर गार्डनमध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र गर्दी वाढल्यानंतर अखेर आता आठ दिवसांनंतर महापालिकेला जाग आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागानं आक्षेप घेत सलमानकडे आयुर्वेदिक तेलासंदर्भात चौकशी केली आहे. टक्कलग्रस्तांना लावत असलेल्या आयुर्वेदिक तेलाच्या संशोधना संदर्भात पुरावे सादर करण्याचा आदेश देखील महापालिकेकडून सलमानला देण्यात आला आहे. महावीर गार्डन मध्ये यापुढे टक्कलग्रस्तांना तेल न लावण्याच्या सूचना महापालिकेकडून सलमानला देण्यात आल्या आहेत.
करावाईची टांगती तलवार
दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून हा सगळा प्रकार चालू होता. शहरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्त गर्दी करत होते. या गार्डमध्ये सलमान नावाचा व्यक्ती या टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्याला आयुर्वेदिक तेल लावत होता. अखेर आठ दिवसांनंतर महापालिकेला जाग आली आहे, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संशोधनासंदर्भातील पुरावे सदार करण्याचे आदेश या व्यक्तीला दिले आहेत. तसेच या पुढे कोणत्याही व्यक्तीला तेल लावू नये अशी सूचना देखील त्याला देण्यात आली आहे. परवानगी नसताना देखील गर्दी जमावत असल्यामुळे आता सलमानवर करावाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची महापालिकेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईची शक्यता आहे.