Marathi News Maharashtra Municipal corporation election which party contesting how many seats read full list
अखेर संपूर्ण पिक्चर झालं क्लिअर… कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार? A टू Z यादी आली समोर
Municipal Corporation Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. सर्व पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही आज अर्ज दाखल केला. बऱ्याच पक्षांना बंडखोरीचाही सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी युती आणि आघाडी झाली आहे, तर काही ठिकाणी अनेक पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आले आहे. राज्यातील सध्याचे राजकीय चित्र काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ठाणे महापालिका (131 जागा)
शिवसेना – 87
भाजप – 40
राष्ट्रवादी – 75 ( स्वबळावर )
काँग्रेस – 100 ( स्वबळावर )
मनसे – 34
शिवसेना (ठाकरे)- 53
राष्ट्रवादी (शरद पवार) – 36
नागपूर महानगरपालिका (151 जागा)
भाजप – 143
शिवसेना – 8
राष्ट्रवादी – 94
काँग्रेस – 151
शिवसेना (ठाकरे) – 10 (आकडा अध्याप अपूर्ण )
राष्ट्रवादी (शरद पवार ) – 64
मनसे – 15
MIM – 3 जागा (आकडा अद्याप अपूर्ण)
बसपा – 8 (आकडा अद्याप अपूर्ण)
वंचित – 75 जागा
चंद्रपूर महापालिका (66 जागा)
भाजप – 58
शिवसेना – 08
राष्ट्रवादी – 40 (स्वबळावर )
काँग्रेस – 63
जनविकास सेना – 3
मनसे – 25 (स्वबळावर)
शिवसेना (ठाकरे) आणि वंचित – प्रत्येकी 33
राष्ट्रवादी (शरद पवार) – 55
पिंपरी चिंचवड महापालिका (128 जागा)
भाजप + आरपीआय आठवले गट युती
भाजप – 123
आरपीआय – 05
दोन्ही राष्ट्रवादी आघाडी
अजित पवार – 110
शरद पवार – 18 (दोन प्रभागात मैत्रीपूर्ण लढत )
शिवसेना स्वबळावर – काही जागा लढणार
शिवसेना (ठाकरे)-मनसे-रासप युती
शिवसेना (ठाकरे) – 63
रासप – 03
मनसे – 19
काँग्रेस – 60 (स्वबळावर लढण्याची शक्यता)
आम आदमी पार्टी – (40 जागा स्वबळावर लढण्याची शक्यता)