Nashik | पोलीस उपमहानिरीक्षकांच्या सोहळ्यात रात्री 10 नंतर म्युझिकल नाईट; सारे नियम धाब्यावर, सामान्यांच्या मात्र हळदीत घुसून सुमोटो कारवाई

नाशिक शहरात सुरू असलेल्या हेल्मेटसक्तीपासून ते रात्री 10 नंतर वाद्य वाजवू नये, हे सारे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांना असतात. राजकारणी, व्हीआयपी आणि पोलीस यांना यातला एकही नियम लागू पडत नाही की काय, असे विचारणा करण्याची वेळ आता आली आहे.

Nashik | पोलीस उपमहानिरीक्षकांच्या सोहळ्यात रात्री 10 नंतर म्युझिकल नाईट; सारे नियम धाब्यावर, सामान्यांच्या मात्र हळदीत घुसून सुमोटो कारवाई
नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा गोदावरी बंगल्यावर पार पडला. या सोहळ्यात रात्री उशिरापर्यंत म्युझिकल नाईट रंगली.

नाशिकः नाशिक शहरात सुरू असलेल्या हेल्मेटसक्तीपासून ते रात्री 10 नंतर वाद्य वाजवू नये, हे सारे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांना असतात. राजकारणी, व्हीआयपी आणि पोलीस यांना यातला एकही नियम लागू पडत नाही की काय, असे विचारणा करण्याची वेळ आता आली आहे. आता हेच पाहा शहरात अनेक ठिकाणी स्वतः पोलीसच हेल्मटशिवाय वाहने चालवतात. त्यानंतर आता दुसरीकडे चक्क पोलीस उपमरानिरीक्षकांच्या कौटुंबिक सोहळ्यात रात्री 10 नंतर म्युझिकल नाईट रंगली. त्यात अलबतच मोठ-मोठ्या वाद्यांचा आवाज, गाणे-बजावणे सारे आले. त्यामुळेच नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सर्वसामान्यांना वेगळा न्याय

नाशिकमधील 16 नोव्हेंबरची घटना. मल्हारखानी झोपडपट्टी भागात लग्न सुरू होते. नवरदेवाच्या घरी मंडप टाकलेला. त्याच्या मित्रांचा गोतावळा, पाहुण्यांची वर्दळ. हळदीचा कार्यक्रम एकदम रंगात आलेला. साहजिकच मग गाणे-बजावणे सुरू झाले. मात्र, पोलिसांनी वाद्य वाजवण्याची परवानगी काढली का, उशिरा का कार्यक्रम सुरू आहे, अशा नाना प्रश्नांच्या फैरी झाडत या कुटुंबाच्या कार्यक्रमाचा पचका केला. इतकेच नाही तर वाजंत्री, नवरदेवासह वरपित्याची वरात थेट पोलीस ठाण्यात आणली. नवरदेव, त्याचे वडील, वाजंत्री अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला. हाच नियम साऱ्यांना असायला हवा की, नाही. फक्त पोलीस म्हणून त्यांना रात्री उशिरापर्यंत गाणे-बजावणे करता येते, असा सवाल विचारला जातोय.

उपमहानिरीक्षक मात्र अपवाद

नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा गोदावरी बंगल्यावर पार पडला. या सोहळ्यात रात्री उशिरापर्यंत म्युझिकल नाईट रंगली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी एकीकडे मेजवानी आणि दुसरीकडे संगीत. उत्तररात्री गाणे-बजावणे वाढले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम शासकीय निवासस्थानी. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती. मात्र, गेल्या महिन्यात सामान्य कुटुंबातील हळद समारंभात घुसून सु-मोटो कारवाई करणाऱ्या पोलिसांना पोलीस उपमहानिरीक्षकांच्या घरी नियम पायदळी तुडवत असलेले दिसले नाहीत. त्यांच्यावर कारवाई तर सोडाच, त्यांच्या लग्नातील सारे कामे करण्यासाठीही पोलीस तत्परता दाखवत होते, अशा प्रतिक्रिया सामान्यांतून व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या लग्न सोहळ्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, यावर भन्नाट टिप्पण्या केल्या जात आहेत. दरम्यान, या बाबत प्रतिक्रियेसाटी पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

इतर बातम्याः

Good News| ऐतिहासिक येवला मुक्तीभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा; महापरिनिर्वाण दिनी सरकारची मोठी घोषणा

Raj Thackeray | राज ठाकरेंचा नाशिक दौरा पुढे ढकलला; महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ पुण्यातून फुटणार, 15 डिसेंबरला MNS चा मेळावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI