AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण; पुन्हा सोयरे-धायरे राजकारण?

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे मोठ्या‌ फरकाने निवडून आले. निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता लक्ष लागलय ते अध्यक्ष पदाकडे. | Nagar District co operative bank election

अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण; पुन्हा सोयरे-धायरे राजकारण?
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 21, 2021 | 2:47 PM
Share

अहमदनगर: नगरमध्ये जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत (Election) महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले. 21 पैकी 17 जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी मतदान होऊ आज मतमोजणी पार पडली. या चार जागांपैकी भाजपला 2 तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. (Nagar District co operative bank election)

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे मोठ्या‌ फरकाने निवडून आले. निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता लक्ष लागलय ते अध्यक्ष पदाकडे. सध्या महाविकास आघाडीकडे 14 तर भाजपकडे 7 जागा, असे चित्र आहे.

मात्र, अहमदनगर हा ‘सो-धा’ अर्थात सोयरे- धायरे राजकारणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अध्यक्षपदी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे किंगमेकर भुमिका पार पाडू शकतात.

सोयरे धायरेच्या राजकारणामुळे विविध पक्षात असलेले नातेसंबंध कर्डीलेंच्या कामी येवू शकतात तर महाविकास आघाडीचे नेते देखील अध्यक्ष पद ताब्यात राहावे या‌साठी प्रयत्न करत आहेत. मात्र आता अध्यक्षपदी बाजी कोण मारणार ? याकडे सर्वांच लक्ष लागलय.

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या ‘किंगमेकर’ नेत्याची बाजी

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील नगर तालुका सेवा सोसायटीमधून अखेर भाजपचे किंगमेकर नेते शिवाजीराव कार्डिले (Shivajirao Kardile) यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी सत्यभामाबाई बेरड यांना अवघी 15 मते मिळाली. त्यामुळे शिवाजीराव कार्डिले यांनी निर्विवाद विजय मिळवला आहे.

तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांनी निसटता विजय मिळवला. पिसाळ यांना 37 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मिनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली. पारनेरमधून उदय गुलाबराव शेळके विजयी ठरले. शेळके यांना 99 तर रामदास भोसले यांना अवघी 6 मते मिळाली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 17 बिनविरोध उमेदवार

1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)

2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)

3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)

4) राहुल जगताप (श्रीगोंदा)

5) अमोल राळेभात (जामखेड)

6) सीताराम गायकर (अकोले)

7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)

8) अरुण तनपुरे (राहुरी)

9) माधवराव कानवडे (संगमनेर)

10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)

11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)

12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)

13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)

14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)

15) अमित अशोक भांगरे (अकोले)

16) गणपतराव सांगळे (संगमनेर)

17) विवेक कोल्हे (कोपरगाव)

संबंधित बातम्या 

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

(Nagar District co operative bank election)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली