AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

अहमदनगरमध्ये सध्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुराळा उडत आहे.

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
| Updated on: Feb 11, 2021 | 7:37 PM
Share

अहमदनगर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा जोर संपला असला तरी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरुच आहेत. अहमदनगरमध्येही सध्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुराळा उडत आहे. जिल्हा बँकेतील एकूण 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, उर्वरित 4 जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे या चारही जागांवर जोरदार झुंज पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या 4 जागांमध्ये किंगमेकर भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचाही समावेश आहे. त्यामुळे कर्डिलेंनाही निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे (Ahmednagar district cooperative bank Election Shivaji Kardile also contesting).

शिवाजी कर्डिले ज्या जागेवरुन निवडणूक मैदानात आहे त्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान आहे. सेवा सोसायटी मतदार संघातील नगर, पारनेर, कर्जत तर बिगरशेती संस्था मतदार संघात एक अशा 4 जागांसाठी जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डीले नगर सोसायटीमधून उभे आहेत. त्यांच्या विरुद्ध महाविकासआघाडीच्या सत्यभामाबाई बेरड या निवडणूक रिंगणात आहेत.

पारनेर सोसायटी मतदार संघात उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले यांच्यात लढत होणार आहे. कर्जतमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. बिगरशेती मतदार संघात विद्यमान संचालक दत्ता पानसरे विरुद्ध प्रशांत गायकवाड अशी दुरंगी लढत होणार आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 17 बिनविरोध उमेदवार

1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)

2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)

3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)

4) राहुल जगताप (श्रीगोंदा)

5) अमोल राळेभात (जामखेड)

6) सीताराम गायकर (अकोले)

7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)

8) अरुण तनपुरे (राहुरी)

9) माधवराव कानवडे (संगमनेर)

10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)

11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)

12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)

13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)

14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)

15) अमित अशोक भांगरे (अकोले)

16) गणपतराव सांगळे (संगमनेर)

17) विवेक कोल्हे (कोपरगाव)

हेही वाचा :

ग्रामपंचायतचा ‘नगरी पॅटर्न’, आजोबा, वडिलांनतर आता बायको, 55 वर्षे सरपंचपद भुषवणारं कुटुंब

आदर्श गाव हिवरे बाजारच्या उपसरपंचपदी पोपटराव पवार, सरपंच कोण?

Special Story : महिलांना सरपंचपदासोबत अधिकार मिळाले, पण गावातील इतर हस्तक्षेपांचं काय?

व्हिडीओ पाहा :

Ahmednagar district cooperative bank Election Shivaji Kardile also contesting

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.