नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या ‘किंगमेकर’ नेत्याची बाजी

या निकालानंतर जिल्हा बँकेच्या आवारात शिवाजीराव कार्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. | Nagar District co operative bank

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या 'किंगमेकर' नेत्याची बाजी
बिगर शेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत प्रशांत गायकवाड यांना 387 तर दत्ता पानसरे यांना 273 मते मिळाली.

अहमदनगर: नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील नगर तालुका सेवा सोसायटीमधून अखेर भाजपचे किंगमेकर नेते शिवाजीराव कार्डिले (Shivajirao Kardile) यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी सत्यभामाबाई बेरड यांना अवघी 15 मते मिळाली. त्यामुळे शिवाजीराव कार्डिले यांनी निर्विवाद विजय मिळवला आहे. (Nagar District co operative bank Shivajirao kardile and ambadas pisal won in their constituencies)

तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांनी निसटता विजय मिळवला. पिसाळ यांना 37 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मिनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली. पारनेरमधून उदय गुलाबराव शेळके विजयी ठरले. शेळके यांना 99 तर रामदास भोसले यांना अवघी 6 मते मिळाली.

या निकालानंतर जिल्हा बँकेच्या आवारात शिवाजीराव कार्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अद्याप काही जागांची मतमोजणी बाकी आहे. बिगर शेती विभागातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत प्रशांत गायकवाड यांना 387 तर दत्ता पानसरे यांना 273 मते मिळाली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 14 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी 85 अधिकारी-कर्मचाऱ्यांची, तसेच 34 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 17 बिनविरोध उमेदवार

1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)

2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)

3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)

4) राहुल जगताप (श्रीगोंदा)

5) अमोल राळेभात (जामखेड)

6) सीताराम गायकर (अकोले)

7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)

8) अरुण तनपुरे (राहुरी)

9) माधवराव कानवडे (संगमनेर)

10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)

11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)

12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)

13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)

14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)

15) अमित अशोक भांगरे (अकोले)

16) गणपतराव सांगळे (संगमनेर)

17) विवेक कोल्हे (कोपरगाव)

संबंधित बातम्या 

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

(Nagar District co operative bank Shivajirao kardile and ambadas pisal won in their constituencies)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI