नगर जिल्हा सहकारी बँक : 17 जागा बिनविरोध, कर्डिलेंच्या जागेसाठी निवडणूक, भाजपच्या ‘किंगमेकर’ला धाकधूक

माजी मंत्री शिवाजी कर्डीले नगर सोसायटीमधून उभे आहेत. त्यांच्या विरुद्ध महाविकासआघाडीच्या सत्यभामाबाई बेरड या निवडणूक रिंगणात आहेत. (Ahmednagar bank Election Shivaji Kardile)

नगर जिल्हा सहकारी बँक : 17 जागा बिनविरोध, कर्डिलेंच्या जागेसाठी निवडणूक, भाजपच्या 'किंगमेकर'ला धाकधूक
भाजप नेते शिवाजीराव कर्डिले
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 2:16 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित चार जागांसाठी उद्या (शनिवारी) मतदान होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे किंगमेकर नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या 4 जागांमध्ये कर्डिलेंचाही समावेश आहे. (Ahmednagar district cooperative bank Election BJP Leader Shivaji Kardile)

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा जोर संपला असला तरी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरुच आहेत. अहमदनगरमध्येही सध्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुराळा उडत आहे. शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे कर्डिलेंनाही निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे.

सेवा सोसायटी मतदार संघातील नगर, पारनेर, कर्जत तर बिगरशेती संस्था मतदार संघात एक अशा 4 जागांसाठी जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डीले नगर सोसायटीमधून उभे आहेत. त्यांच्या विरुद्ध महाविकासआघाडीच्या सत्यभामाबाई बेरड या निवडणूक रिंगणात आहेत.

पारनेर सोसायटी मतदार संघात उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले यांच्यात लढत होणार आहे. कर्जतमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. बिगरशेती मतदार संघात विद्यमान संचालक दत्ता पानसरे विरुद्ध प्रशांत गायकवाड अशी दुरंगी लढत होणार आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 17 बिनविरोध उमेदवार

1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)

2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)

3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)

4) राहुल जगताप (श्रीगोंदा)

5) अमोल राळेभात (जामखेड)

6) सीताराम गायकर (अकोले)

7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)

8) अरुण तनपुरे (राहुरी)

9) माधवराव कानवडे (संगमनेर)

10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)

11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)

12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)

13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)

14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)

15) अमित अशोक भांगरे (अकोले)

16) गणपतराव सांगळे (संगमनेर)

17) विवेक कोल्हे (कोपरगाव)

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 14 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 17 बूथ असून 1376 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या प्रक्रियेसाठी 85 अधिकारी-कर्मचाऱ्यांची, तसेच 34 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

(Ahmednagar district cooperative bank Election BJP Leader Shivaji Kardile)

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.