नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, मात्र 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं

नागपूर जिल्ह्यात 1300 गावांना वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे

नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, मात्र 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं

नागपूर : नागपूर जिल्ह्यात 1300 गावांना वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे (Nagpur District 1300 Villages). तर दुसरीकडे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे (Nagpur District 1300 Villages).

नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 342 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 94 हजार 575 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर असली, तरीही जिल्ह्यातील 1867 गावांपैकी
तब्बल 1300 गावांनी कोरोनाला गावाच्या वेशीवरंच रोखलं आहे.

गेल्या सात महिन्यात या 1300 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला नाही. एप्रिल, मे, जून आणि जुलै या काळात नागपूर शहरातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यावेळेस खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बऱ्याच गावांनी आपल्या सीमा सील केल्या होत्या. नवीन व्यक्तीला गावात प्रवेश नव्हता, गावातून शहरात जाण्याचं प्रमाण कमी केलं होतं, त्याचंच यश म्हणून आजपर्यंत तब्बल सात महिने गावकऱ्यांनी जिल्ह्यातील 1300 गावांमध्ये कोरोनाला शिरकाव करु दिला
नाही (Nagpur District 1300 Villages).

जिल्हा परिषदेच्या जनजागृतीचा गावांना फायदा या गावांना झाला. त्यामुळे 1300 गावांनी गावामध्या कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही.

नागपूर जिल्ह्यातील 1300 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यात नागपूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेची महत्त्वाची भूमिका आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असताना, गावांमध्ये जनजागृती, बाहेरुन आलेल्या
व्यक्तीला सक्तीनं 14 दिवस क्वॉरंटाईन करणे आणि गावं सुरक्षित राहिल याची काळजी घेणे. या सर्व बाबींकडे जिल्हा परिषदेनं जातीनं लक्ष दिलं. त्यामुळेच सात महिन्यात जिल्ह्यातील या 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरंच रोखलं.

Nagpur District 1300 Villages

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी ठरण्याची शक्यता, युके वॅक्सिन टास्क फोर्स अध्यक्षांचा दावा

आनंदाची बातमी: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *