आनंदाची बातमी: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे. | Coronavirus

आनंदाची बातमी: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

मुंबई: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी महाराष्ट्रात 3645 रुग्ण आढळले होते. तर आज राज्यात कोरोनाच्या 5363 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनातून बऱ्या झालेल्या 7836 रुग्णांना घरी सोडण्यात आले. याशिवाय, आज 115 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे. (Coronavirus surges in Maharashtra)


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 87 लाख 33 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 54 हजर 028 (19.01 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 25लाख 28 हजार 907 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 13 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. आज मुंबईत कोरोनाच्या 801 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 1043 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर मुंबईच्या सर्व 24 प्रशासकीय विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी (डबलिंग रेट) 132 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.


सणासुदीच्या काळात पाच राज्यांमध्ये कोरोना संसर्गात वाढ
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या सण-उत्सवांचा काळ सुरू आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याने करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी माध्यमांना याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ व दिल्ली या पाच राज्यांमध्ये सण-उत्सवांमुळे करोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. परंतु, सुदैवाने या राज्यातील कोरोनाच्या मृत्यूदरात घट पाहायला मिळत आहे.

संंबंधित बातम्या:

कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट, राज्य सरकारचा मोठा निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope | आरोग्य सेवकांना सर्वात आधी लस दिली जाणार: राजेश टोपे

Corona Vaccine | कोरोना लस आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्य देणार : राजेश टोपे

(Coronavirus surges in Maharashtra)
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *