AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DJ Ban : 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा सर्वात मोठा निर्णय!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजेला बंदी घातली आहे.

DJ Ban : 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा सर्वात मोठा निर्णय!
vishwas nangre patil and nagpur dj banImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 3:11 PM
Share

DJ Ban in Nagpur : सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. हा उत्सव उत्साहवर्धक आणि चांगला ठरावा यासाठी मुंबई, पुणे तसेच राज्यभरातील सर्वच गणेश मंडळं कामाला लागली आहेत. पुणे आणि मुंबईचा गणोशोत्सव तर देशभरात चर्चेचा विषय असतो. दरम्यान, गणेशोत्सवासोतबच सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने आता डीजेबंदी, लाऊडस्पीकरवरील बंदीची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात लाऊडस्पीकर तसेच डीजे, ढोल-ताशांवरील बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. असे असतानाच आता नागपूरमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.

नेमका निर्णय काय घेण्यात आला?

समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार नागपुरात आजपासून म्हणजेच 3 सप्टेंबर रोजीपासून एक नोव्हेंबरपर्यंत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.  नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. नागपुरात आज रात्रीपासून ते 1 नोव्हेंबरपर्यंत डिजे, डिजेचे वाहन, डिम लाईट, लेजर लाईटवर बंदी असेल.  या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या या आदेशामुळे मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टम वापरावर निर्बंध आले आहेत.

पुण्यात नेमकी काय मागणी केली जात आहे?

पुण्यात डीजे, डॉल्बी, ढोल-ताशे यावर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. विद्यानंद  बापट या सामान्य नागरिकाने याबाबत आवाज उठवला आहे. पुण्याच्या महापालिका बैठकीत त्यांनी जाहीरपणे डीजेवर बंदी घालावी अशी मागणी घातल्यानंतर हा मुद्दा आता पुण्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकांवरही बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ढोल ताशे कालबाह्य झालेली वाद्ये आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण जास्त होते. त्यामुळे पुणेकरांना या काळात जास्त त्रास होतो, असे त्यांचे मत आहे. विद्यानंद बापट यांच्या याच भूमिकेमुळे

पुण्यातील गणेशमंडळे नेमकी काय भूमिका घेणार?

दरम्यान, आता नागपुरात डीजेवर बंदी घालण्यात आल्यानंतर नागपूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, तेथील गणेशमंडळे नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती