AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : स्वयंपाकघरात फ्रीज कोणत्या दिशेला ठेवावा, कोणता रंगा आणेल सुख – समृद्धी? काय सांगतं शास्त्र

Vastu Tips : वास्तुशास्त्रामध्ये घरात आनंद, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी विविध नियम आहेत. फ्रिज कुठे ठेवायचा याचे देखील नियम आहेत. तर जाणून घ्या, किचनमध्ये फ्रीज कुठे ठेवायचा आणि तो कोणत्या रंगाचा असला पाहिजे....

Vastu Tips : स्वयंपाकघरात फ्रीज कोणत्या दिशेला ठेवावा, कोणता रंगा आणेल सुख - समृद्धी? काय सांगतं शास्त्र
| Updated on: Oct 20, 2026 | 3:51 PM
Share

Vastu Tips : हिंदू धर्मा वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. ज्यामुळे कोणत्या गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतील हे आपल्याला कळतं. फ्रीजबद्दल देखील असंच काही आहे. फ्रीज पदार्थ सुरक्षित ठेवतं. पण फ्रिज कुठे ठेवायचा आणि तो कोणत्या रंगाचा असला पाहिजे, याबद्दल देखील शास्त्रात सांगितलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये घरात आनंद, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी विविध नियम आहेत. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते बेडरूम आणि स्वयंपाकघरापर्यंत, प्रत्येक कोपऱ्याचे आणि दिशेचे महत्त्व आहे. असं देखील मानलं जातं की स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह, सिंक आणि फ्रीज यांसारख्या उपकरणांची योग्य मांडणी केल्याने घरात संतुलित आणि सुव्यवस्थित वातावरण टिकून राहते.

प्रत्येक आधुनिक स्वयंपाकघराचा फ्रीज हा एक अविभाज्य भाग आहे. पण तो कोणत्या दिशेला ठेवावा? गॅस स्टोव्हजवळ फ्रिज ठेवणे योग्य आहे का? आणि वास्तूनुसार फ्रीजचा रंग कोणता असावा? यासाठी स्वयंपाकघराशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तू नियम जाणून घेऊया.

स्वयंपाकघरात फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे? वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील नैऋत्य किंवा वायव्यकोपऱ्यात फ्रीज ठेवणं सर्वोत्तम मानलं जातं. काही वास्तु तज्ञ आग्नेय, पश्चिम किंवा उत्तर दिशेला फ्रीज ठेवण्याचा सल्लाही देतात. मात्र, वास्तूनुसार ईशान्य दिशेला फ्रीज ठेवणं टाळावं, कारण ही दिशा अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि पूजेसाठी राखीव मानली जाते. स्वयंपाकघर लहान असल्यास, अशी जागा निवडा जिथून फ्रीजचा दरवाजा सहज उघडता येईल आणि त्यामुळे हालचालीत अडथळा येणार नाही.

फ्रिज गॅस स्टोव्हजवळ का ठेवू नये? वास्तूनुसार, गॅस स्टोव्ह ‘अग्नी तत्त्वा’चे प्रतिनिधित्व करतो, तर फ्रिज थंडपणाशी संबंधित आहे. ही विरोधी तत्त्वे एकमेकांसमोर किंवा खूप जवळ असू नयेत. व्यावहारिक दृष्ट्या, गॅस स्टोव्ह किंवा ओव्हनसारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांजवळ फ्रिज ठेवल्याने त्याच्या कंप्रेसरवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे, या दोन्हींमध्ये योग्य सुरक्षित अंतर राखणं अत्यावश्यक आहे.

वास्तूनुसार फ्रिजचा कोणता रंग शुभ मानला जातो? पांढरा रंग शांती, स्वच्छता आणि साधेपणाचं प्रतीक आहे. स्वयंपाकघरातील पांढरा फ्रिज जागेला मोकळं आणि स्वच्छ स्वरूप देतो. क्रीम किंवा ऑफ-व्हाइट रंग स्वयंपाकघराच्या सजावटीशी सहज जुळतात आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करतात. आधुनिक मॉड्यूलर किचनमध्ये सिल्व्हर किंवा स्टील फिनिश खूप लोकप्रिय आहेत, जे वास्तूच्या दृष्टिकोनातूनही योग्य मानले जातात.

हिरवा रंग वाढ आणि समृद्धीशी संबंधित असल्याने, लाकडी किंवा हिरव्या रंगाचे फिनिश देखील निवडले जाऊ शकतात. फिकट निळा रंग मनःशांती देतो आणि थंडावा वाढवतो. लक्षात ठेवण्यासारखं इतर महत्त्वाचे वास्तू नियमांबद्दल सांगायचं झालं तर, फ्रीज स्वयंपाकघराच्या अगदी मध्यभागी ठेवण्याऐवजी, तो थोड्या अंतरावर एका योग्य भिंतीजवळ ठेवा. पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी फ्रीज आणि भिंतीमध्ये 2 – 3 इंच जागा सोडा.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!