AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानभवनातच काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; कुणी धरली भाजपची वाट?

Hingan Ghat Congress Leader Inter in BJP : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. विधानभवनातील पक्ष कार्यालयातच पक्षप्रवेश पार पडलेत. हिवाळी अधिवेशनादरम्यानच कुणी धरली भाजपची वाट? लोकसभा विधानसभा निवडणुकीआधी काय घडतंय? वाचा सविस्तर...

विधानभवनातच काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; कुणी धरली भाजपची वाट?
| Updated on: Dec 14, 2023 | 8:42 AM
Share

नागपूर | 14 डिसेंबर 2023 : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात काही पक्षांमध्ये इन्कमिंग वाढलं आहे. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. चक्क विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान काही पक्षप्रवेश पार पडले. हिवाळी अधिवेशनातंच भाजपकडून पक्षप्रवेशाचा झाले आहेत. हिॅगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी विधानभवनातील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश उरकले. हिंगणघाट मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेनेच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या भाजप प्रवेशाची हिंगणघाटमध्ये जोरदार चर्चा होतेय.

काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

हिंगणघाटमधील या नेत्यांनी आधी उपमुख्यमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरातच पक्ष प्रवेश झाला. आगामी निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून पक्षप्रवेशावर भर आहे. अशात हिॅगणघाटमधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस शहराध्यक्ष संदीप देरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षांतराची जिल्ह्यात चर्चा होतेय.

या नेत्यांनी केला पक्ष प्रवेश

सभापती ललित डगवार, सुशीला लढी, रवींद्र लढी शिवसेना प्रमुख, कमलेश भोयर उपसरपंच साखरा, रमेशराव मडावी सरपंच परडा, संजय शेळकी धपकी यांनी भाजपत प्रवेश केला. सौ. नीता शेळकी सरपंच- धपकी , प्रल्हाद नांदुरकर ग्रामपंचायत सदस्य- परडा, नामदेवराव उमाटे- समुद्रपूर, नारायणराव बादाने- पारोधी, विनायकराव मोंढे- अंतरगाव यांनीही भाजपची वाट धरली आहे. निवडणूकीची तयारी म्हणून भाजपकडून ग्रामीण भागात मिशन पक्षप्रवेश राबवण्यात येतंय. त्याच अंतर्गत हिंगणघाटमधील नेत्यांचे पे पक्ष प्रवेश झाले आहेत.

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच राजकीय नेत्यांचं पक्षांतर सुरु झालं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय बदल झाल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. त्यामुळे येत्या काळाता राज्याच्या राजकारणात काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.