AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीत 116 युवक-युवती विवाहबंधनात अडकणार! 16 आत्मसर्मपित नक्षलवाद्यांचा समावेश

कोरोनामुळं सामूहिक विवाह सोहळे बंद झाले होते. गर्दी टाळण्यासाठी हे सारं करावं लागत होतं. पण, आता कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळं विवाह सोहळेही धूमधडाक्यात साजरे होऊ लागलेत.

गडचिरोलीत 116 युवक-युवती विवाहबंधनात अडकणार! 16 आत्मसर्मपित नक्षलवाद्यांचा समावेश
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 6:55 AM
Share

नागपूर : गडचिरोली येथे येत्या 13 मार्च रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मैत्री परिवार संस्था (Maitri Parivar Sanstha) नागपूर व गडचिरोली पोलीस दल (Gadchiroli Police Force), पोलीस दादालोरा खिडकी यांनी यासाठी पुढाकार घेतला. गडचिरोली येथील चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन येथे 13 मार्च रोजी, रविवारी सकाळी 10 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह समारोहात 16 आत्मसर्मपित नक्षलवाद्यांचा समावेश आहे. एकूण 116 युवक-युवतींचा विवाह होणार आहे. मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे (President Pvt. Sanjay Bhende) यांनी ही माहिती दिली. गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा. नक्षलवाद ही येथील प्रमुख समस्या. या जिल्ह्यातील नागरिकांना दहशतमुक्त व हिंसामुक्त जीवन जगता यावे, यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेने गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला आहे. वर्षभर येथे रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, सामूहिक विवाह सोहळे आदी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

यंदाचे आयोजनाचे चौथे वर्ष

2018 मध्ये गडचिरोली जिल्हा पोलिस विभागाच्या सहकार्याने गडचिरोली येथे सामूहिक विवाह सोहळा झाला होता. त्यावेळी दोन आत्मसर्मपित नक्षलवाद्यांसह एकूण 105 आदिवासी युवक-युवतींचे विवाह करण्यात आले होते. वर्ष 2019 मध्ये 9 अहेरी येथे 5 आत्मसर्मपित नक्षलवाद्यांसह एकूण 55 जोडप्यांचे विवाह झाले. कोरोनामुळं मधल्या काळात विवाह समारोह आयोजनात ब्रेक पडला. मैत्री परिवार संस्थेचा हे सामूहिक विवाह सोहळा आयोजनाचे चौथे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 13 मार्च रोजी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते होईल.

यांची राहणार उपस्थिती

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक-अभियान सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, नागरी कृती शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे प्रामुख्याने उपस्थित राहतील. तसेच सामाजिक कायकर्ते व गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथ कुंभारे यांचीही उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन मैत्रीचे सचिव प्रमोद पेंडके, मैत्री परिवार संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष निरंजन वासेकर व गडचिरोली पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी केली विमानतळाची सैर, भंडाऱ्यातील जिल्हाधिकारी कदम यांचा पुढाकार

Buldhana | समृद्धीच्या कंत्राटदाराला 21 कोटी 64 लाख रुपयांचा दंड, तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात दिलंय नेमकं कारण

नागपुरात शनिवार, रविवार चित्रपटांची मेजवाणी, सहावे ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.