Smart City | नागपुरात 3,600 कॅमेरे ठेवणार सराईत गुन्हेगारांवर नजर; Command and Control Centerमध्ये 32 मोठे स्क्रीन

होम स्वीट होम प्रकल्पामध्ये सदनिकांचे निर्माण काम सुरू झाले आहे. येथे मुलांकरिता खेळण्याची जागा, उद्यान, पार्किंग सुविधा, खेळण्याचे मैदान प्रस्तावित आहे. ही इमारत हरित इमारत असणार आहे.

Smart City | नागपुरात 3,600 कॅमेरे ठेवणार सराईत गुन्हेगारांवर नजर; Command and Control Centerमध्ये 32 मोठे स्क्रीन
स्मार्ट सिटी मिशनचे डायरेक्टर कुणाल कुमार मंगळवारी विविध विकास कामांचा आढावा घेताना. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 7:00 AM

नागपूर : केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि स्मार्ट सिटी मिशनचे डायरेक्टर (Director of Smart City Mission) कुणाल कुमार यांनी मंगळवारी (ता. 26) विविध विकास कामांचा आढावा घेतला. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नागपूर शहरात कामं सुरू आहेत. बैठकीनंतर त्यांनी पोलीस आयुक्तालयासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची (Command and Control Center) पाहणी केली. या सेंटरचे बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. त्यांनी लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ‘स्टेट ऑफ आर्ट कमांड अँड कंट्रोल सेंटर नागपूर स्मार्ट सिटीतर्फे उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 32 मोठे स्क्रीन लावण्यात आले आहे. नागपूर पोलस या केंद्रातून शहरात लावण्यात आलेल्या 3600 कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागपुरातील सराईत गुन्हेगारांवर निगा ठेवणार आहेत. या माध्यमातून पोलिस विभागाला एकाच ठिकाणावरून शहरातील वाहतूक नियंत्रण (Traffic Control in the city) व डायल 112 च्या माध्यमातून विविध सुरक्षा व्यवस्था तत्परतेने पुरविता येईल.

1,730 एकरांत रस्त्याची कामे

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती यावेळी दिली. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीतर्फे पारडी, पुनापूर, भरतवाडा आणि भांडेवाडी येथे 1730 एकरात ‘टेंडर सुअर’ प्रकल्पांतर्गत 49.42 किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये 30 मीटर, 24 मीटर, 18 मीटर, आणि 9 मीटर रुंदीच्या रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय 10 पुलांचे काम, 4 जलकुंभांचे काम, एलईडी लाईट, मलनिस्सारण व्यवस्था, पाणी पुरवठा इत्यादी कार्य सुद्धा प्रगतीपथावर आहेत. होम स्वीट होम प्रकल्पामध्ये सदनिकांचे निर्माण काम सुरू झाले आहे. येथे मुलांकरिता खेळण्याची जागा, उद्यान, पार्किंग सुविधा, खेळण्याचे मैदान प्रस्तावित आहे. ही इमारत हरित इमारत असणार आहे. तसेच पुनापूर येथे प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी भूखंड पडून अभिन्यास तयार करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीतर्फे 15 इलेक्ट्रिक बस

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘बायोमायनिंग प्रकल्प’ उभारण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामुळे डम्पिंग यार्ड परिसरात वर्षानुवर्षापासून साचलेल्या कच-याची विल्हेवाट लावता येणार आहे. कच-यामुळे गुंतलेली जागा मोकळी होईल. याशिवाय स्मार्ट सिटीतर्फे 15 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देत संपूर्ण शहरात जास्तीत जास्त चार्जींग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.