Akola MLC voting | 822 मतदार करणार आज मतदान; खंडेलवाल आणि बाजोरिया यांची प्रतिष्ठा पणाला

प्रशासनाने मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी केली आहे. कोविड नियमाचे पालनही या ठिकाणी तंतोतंत होत आहे. अकोला -बुलडाणा -वाशीम मतदार संघासाठी उमेदवार असलेलं गोपिकीशन बाजोरिया आणि वसंत खंडेलवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

Akola MLC voting | 822 मतदार करणार आज मतदान; खंडेलवाल आणि बाजोरिया यांची प्रतिष्ठा पणाला
वसंत खंडेलवाल व गोपिकीशन बाजोरिया
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 10:15 AM

अकोला : अकोला बुलडाणा वाशीम विधानपरिषदेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानासाठी सुरुवात झालीय. दुपारी चार वाजतापर्यंत हे मतदान सुरू राहील. बुलडाणा जिल्ह्यात 367 मतदार असून नगरपालिका सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांचा यात समावेश आहे. तर जिल्ह्यात 11 मतदान केंद्र असून 66 अधिकारी कर्मचाऱ्यांची ड्युटी का मतदान प्रक्रियेसाठी लागली आहे. मतदानाची वेळ जर सकाळी 8 वाजता सुरू झाली असली तरीही मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असल्याने उशिरा मतदान करतील.

प्रशासनाने मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी केली आहे. कोविड नियमाचे पालनही या ठिकाणी तंतोतंत होत आहे. अकोला -बुलडाणा -वाशीम मतदार संघासाठी उमेदवार असलेलं गोपिकीशन बाजोरिया आणि वसंत खंडेलवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांत विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी आज मतदान होणार असून यात 822 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात महाविकास आघाडीकडून गोपिकीशन बाजोरिया आणि भारतीय जनता पक्षाकडून वसंत खंडेलवाल हे दोन उमेदवार रिंगणात उभे असून या दोघांमध्ये लढत होणार आहे.

तीन जिल्ह्यांमधील 822 मतदार

822 मतदारांसाठी तिने जिल्ह्यामध्ये आज मतदान होत आहे. यात अकोला जिल्ह्यात 7 मतदान केंद्र असून वाशीम जिल्ह्यात 4 मतदान केंद्र आहेत तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11 मतदान केंद्र आहेत. यामध्ये अकोला जिल्हा परिषदमधील 60 सदस्य आणि पंचायत समिती सभापती तर अकोला महानगरपालिकेतले 81 नगरसेवक, अकोट नगर परिषद चे 36 सदस्य, तर तेल्हारा नगरपरिषद चे 19 सदस्य, तर बाळापूर नगर परिषदेचे 26 सदस्य, तर पातूर नगर परिषदेचे 19 सदस्य, तर मुर्तीजापूर नगर परिषदेचे 26 सदस्य आणि बार्शिटाकळी नगरपरिषदेचे 20 असे एकूण 140 सदस्य यात मतदान करणार आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे 58 सदस्य, वाशिम नगर परिषदेचे 34 सदस्य, कारंजा नगर परिषदेचे 32 सदस्य, मंगळापूर नगरपरिषदेचे 21 सदस्य आणि रिसोड नगरपरिषदेचे 23 सदस्य असे एकूण 110 सदस्य आज मतदान करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा नगर परिषदेमधील 21 सदस्य, चिखली नगर परिषदेमधील 30 सदस्य, देऊळगाव राजा नगर परिषदेमधील 21 सदस्य, सिंदखेड नगर परिषदेमधील 19 सदस्य, लोणार नगरपरिषदेमधील 20 सदस्य, मेहकर नगर परिषद मधील 27 सदस्य, खामगाव नगर पालिकेमधील 37 सदस्य, शेगाव नगर पालिकेतील 32 सदस्य, जळगाव जामोद नगरपरिषदेचे 21 सदस्य, नांदुरा नगरपालिका चे 26 सदस्य आणि मलकापूर नगरपरिषदेचे 32 सदस्य अशा एकूण अकरा नगरपरिषदेचे 296 नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.

उमेदवारांना नाही मतदानाचा अधिकार

विधान परिषदेची निवडणूक होत आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने यात उमेदवारांना मतदानाचा अधिकार नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार आज मतदान करू शकणार नाहीत. जर यातील एकही उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य असता तर त्याला मतदानाचा अधिकार मिळाला असता. ही पहिली निवडणूक आहे ज्यात उमेदवारालाच मतदान करता येत नाही.

Nagpur MLC Voting | पक्षाची तटस्थ भूमिका, तरीही बसपचे दोन नगरसेवक मतदानाला, कोणाला मत देणार?

Nagpur MLC Election | फक्त दोन ओळखपत्राला मान्यता, मतदानाची वेळ 4 पर्यंत, पसंतीक्रमाने मतदान

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.