AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur MLC Election | फक्त दोन ओळखपत्राला मान्यता, मतदानाची वेळ 4 पर्यंत, पसंतीक्रमाने मतदान

प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाणार फार्मर स्कॅनर मध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे.

Nagpur MLC Election | फक्त दोन ओळखपत्राला मान्यता, मतदानाची वेळ 4 पर्यंत, पसंतीक्रमाने मतदान
नागपूर : मतदान केंद्रावर सॅनिटायझर व थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 10, 2021 | 10:02 AM
Share

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी दोनच ओळखपत्र ग्राह्य धरण्यात आले आहेत. मतदानाला येताना मतदाराला आपल्यासोबत भारत निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेने निर्गमित केलेले ओळखपत्र अनिवार्य आहे. याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही, असे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय.

पसंतीक्रम आवश्यक

मतदान करताना मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. 1, 2, 3 किंवा I,॥, III अशा आकड्यांमध्ये आपला पसंती क्रमांक दर्शविणे आवश्यक आहे. शब्दांमध्ये पसंती क्रमांक नोंदविता येणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, कॅमेरा, टॅब, तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. एकूण 15 मतदान पथके यासाठी कार्य करणार आहे.

येथे होणार मतदान

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघात नागपूर महानगर पालिकेच्या नगरसेवकांना मतदान करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय बाजूला तहसील कार्यालय नागपूर शहर खोली क्रमांक 2, तहसीलदार कार्यालय तहसील कार्यालय नागपूर शहर खोली क्रमांक 4 या ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी नागपूर ग्रामीण येथील तहसील कार्यालय खोली क्रमांक 1, मध्ये (आमदार निवास परिसर) मतदान करता येणार आहे. अन्य मतदान ग्रामीण भागात आहे. यामध्ये नगरपरिषद नरखेड येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय नरखेड खोली क्रमांक 1, नगर परिषद काटोल येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय काटोल खोली क्रमांक 1, नगर परिषद सावनेर व नगरपरिषद खापा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय सावनेर खोली क्रमांक 1, नगरपरिषद रामटेक येथील सर्व नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय रामटेक खोली क्रमांक 1, नगर परिषद कामठी नगर पंचायत महादुला येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय कामठी खोली क्रमांक 1, नगर परिषद कळमेश्वर ब्राह्मणी व नगरपरिषद मोहपा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय कळमेश्वर खोली क्रमांक 1, नगर परिषद उमरेड येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय उमरेड खोली क्रमांक 1 नगर परिषद कन्हान पिंपरी येथील नगरसेवकांसाठी नगर परिषद कार्यालय कन्हान पिंपरी खोली क्रमांक 1, नगरपंचायत मौदा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय मौदा खोली क्रमांक 1 नगर परिषद बुटीबोरी येथील नगरसेवकांसाठी नगरपरिषद कार्यालय बुटीबोरी खोली क्रमांक 1, नगरपंचायत पारशिवनी येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय पारशिवणी खोली क्रमांक 1, नगर परिषद वानाडोंगरी येथील नगरसेवकांसाठी नगरपरिषद कार्यालय वानाडोंगरी खोली क्रमांक 1 या ठिकाणी सुविधा देण्यात आली आहे.

बचत भवन येथे मतमोजणी 14 डिसेंबरला

10 ते 14 मतपेट्या बचत भवन येथील स्टॉंगरूम मध्ये ठेवण्यात येतील. पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बचत भवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. या परिसरात आज 144 कलम लागू राहील. याच ठिकाणी 14 तारखेला मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 4 टेबलवर मतमोजणी चालेल.

उमेदवार एकूण तीन

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, रवींद्र प्रभाकर भोयर, मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. 10 डिसेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतापर्यंत मतदान व 14 डिसेंबरला स्थानिक प्राधिकारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

तालुक्याचे सेतू केंद्र बंद

सर्व मतदान केंद्र तहसील कार्यालयाच्या आसपास असल्यामुळे मतदानाच्या दिवशी 10 डिसेंबरला तहसील कार्यालय नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय, तहसील कार्यालय नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवली जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी धारा 144 लागू असल्यामुळे मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात इतर लोकांना मज्जाव करण्यात आला आहे.नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोविड प्रोटोकॉल अनिवार्य

या निवडणुकीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाणार फार्मर स्कॅनर मध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे. सर्व केंद्रावर सॅनिटायझर थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

MLC Election: विधान परिषदेच्या 2 जागांसाठी मतदान, अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

Nagpur MLC Election : ‘मी असमर्थता दर्शवली नाही’, पत्रकावर छोटू भोयर यांचं स्पष्टीकरण; देशमुखांसाठी काम करणार असल्याचाही दावा!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी