MLC Election: विधान परिषदेच्या 2 जागांसाठी मतदान, अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे.

MLC Election: विधान परिषदेच्या 2 जागांसाठी मतदान, अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra MLC Election Result 2021
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 6:55 AM

नागपूर: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आलीय.छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

नागपूरमध्ये भाजप वरचढ

नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Dr Ravindra Bhoyar aka Chhotu Bhoyar) यांना काँग्रेसकडून (Congress) तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळं नागपूर विधान परिषद मतदारसंघात सध्या तरी भाजपचं वर्चस्व दिसत आहे.

अकोला बुलडाणा वाशिमध्ये चुरशीची लढत?

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा ‘ जॅकपॉट ‘ ठरणार आहेत. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगणार आहे.

मतदारसंघातील पक्षीय बलाबल

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस 190, शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 76 असे एकूण 396 मते आहेत तर 130 तर भाजपाकडे 244 मते आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार आहेत.

इतर बातम्या:

Nagpur MLC Election : काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की, छोटू भोयर ऐवजी मंगेश देशमुखांना पाठिंबा जाहीर

Nagpur MLC Election : ‘मी असमर्थता दर्शवली नाही’, पत्रकावर छोटू भोयर यांचं स्पष्टीकरण; देशमुखांसाठी काम करणार असल्याचाही दावा!

Maharashtra MLC election 2021 Nagpur Akola Washim Buladana constituency voting today BJP Shivsena Congress contest seats

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.