AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेळ पडल्यास ड्रोन कॅमेरे पुरवायला तयार; तुम्ही कारवाई करा, मी तुमच्या पाठिशी : अनिल देशमुख

नियम तोडणाऱ्यांविरोधात तुम्ही कारवाई करा, मी तुमच्या पाठीशी आहे," असे म्हणत गृहमंत्री अनील देशमुख यांनी नागपुरातील पोलिसांना पाठिंबा दिला. (Anil Deshmukh police rule)

वेळ पडल्यास ड्रोन कॅमेरे पुरवायला तयार; तुम्ही कारवाई करा, मी तुमच्या पाठिशी : अनिल देशमुख
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र
| Updated on: Jan 17, 2021 | 3:55 PM
Share

नागपूर : “शहरात गुन्ह्यांचे प्रमाण बरेच आहे. बॉडी वॉर्न कॅमेरा पोलिसांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. पोलिसांशी हुज्जत घालणे, महिलांसोबत छेडछाड करणे, असे अनेक प्रकार रोज घडत असतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी  बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचा उपयोग करता येऊ शकतो,” असे अनील देशमुख म्हणाले. तसेच गरज पडल्यास शहराच्या सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेरेसुद्धा पुरवायला तयार आहे. तुम्ही नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई करा. मी तुमच्या पाठिशी आहे, असेही देशमुख म्हणाले. नागपुरातील वाहतूक पोलिसांना अनिल देशमुख यांच्या हस्ते 200 बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. (Anil Deshmukh orderd police to take strict action against the rule breaker)

ड्रोन कॅमेऱ्यांची गरज असल्यास ते पुरवायला तयार

पुढे बोलताना अनील देशमुख यांनी शहराच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रकाश टाकला. शहरात घढणाऱ्या गैरप्रकारांवर ड्रोन आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येऊ शकेल. मुंबईत ड्रोन कॅमेऱ्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच नागपूर पोलिसांना शहरातील गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची गरज पडल्यास तेही पुरवायला तयार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.

स्पोर्ट बाईकवाल्यांवर कारवाई करा

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले. नागपुरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आगामी काळात त्यात आणखी सुधार करून पब्लिक अनाऊन्स सिस्टम सुरू करता येईल. तसेच स्पोर्ट बाईकवावरुन प्रवास करणारे सर्रास वाहतूक नियमांना तोडतात.  त्यामुळे स्पोर्ट बाईक चालकांरिरोधात कारवाई करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले.

तसेच, यावेळी बोलताना मांजा वापरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर करवाई करण्याचेही देशमुख यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून मांजामुळे कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी कठोर कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या :

खुशखबर! 12538 जागांसाठी पोलीस भरती! 5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु!

पोलीस भरतीबाबत शुद्धी परिपत्रक काढणार, अनिल देशमुखांनी ग्वाही दिल्याचा मेटेंचा दावा

स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा खुद्द गृहमंत्र्यांकडून सत्कार

(Anil Deshmukh orderd police to take strict action against the rule breaker)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.