Ashish Deshmukh : काँग्रेसमधली खदखद! आशिष देशमुख देणार महासचिव पदाचा राजीनामा; म्हणाले, आश्वासन पाळलं नाही

सोनिया गांधी यांच्यावर कोणाचातरी दबाव आहे, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, लोकशाही टिकून राहण्यासाठी, काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असून पक्ष सोडणार नाही, असे आशिष देशमुख यानी सांगितले.

Ashish Deshmukh : काँग्रेसमधली खदखद! आशिष देशमुख देणार महासचिव पदाचा राजीनामा; म्हणाले, आश्वासन पाळलं नाही
राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगढी यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करताना आशिष देशमुखImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 10:27 AM

नागपूर : डॉ. आशिष देशमुख काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा देणार आहेत. इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) या बाहेरच्या उमेदवाराला महाराष्ट्रावर लादल्याने देशमुख नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये खदखद वाढली आहे. तर बाहेरचा उमेदवार दिल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधला हा पहिला राजीनामा (Resignation) आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे दोनच आमदार आहेत. तर राज्यसभेचे तीन-तीन खासदार कसे, असा सवाल त्यांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आपल्याला राज्यसभेचे आश्वासन दिले होते. सोनीया गांधी यांनी आश्वासन देऊन ते पाळले नाही, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. तर पदाचा राजीनामा देणार आहे मात्र पक्ष सोडणार नाही, असे आशिष देशमुख यांनी सांगितले.

‘काहीजणांचा हा कट’

या व्यक्तीने 2019मध्ये मुरादाबाद येथून लोकसभा लढवली होती. तिथे त्यांचा दारूण पराभव झाला. डिपॉझिटही जप्ट झाले. दहा लाखांहून अधिक मतांनी पडले. त्यामुळे स्थानिक उमेदवार देणे हीच काँग्रेसमधील सर्वसामान्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील निवडणुका जिंकायच्या असतील, तर येथील नेत्यांना महत्त्व देऊन उमेदवारी देणे गरजेचे होते. पण महाराष्ट्राचाही उत्तर प्रदेश करायचा काहीजणांचा कट आहे, असा आरोप त्यांनी केला. दिलेल्या आश्वासनांना तिलांजली देण्याचे काम काँग्रेसमध्ये सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले आशिष देशमुख?

‘इम्रान प्रतापगढी यांचे क्वालिफिकेशन काय?’

या दोन दिवसांच्या शिर्डीत काँग्रेसचे चिंतन शिबिर होणार आहे. या शिबिरात मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विनंती करणार आहे, की कार्यकर्त्यांना आणि प्रमुख नेत्यांना मुशायरे कसे करायचे, शायरी कशी करायची, कव्वाली कशी करायची याचे ट्रेनिंग द्यावे, इम्रान प्रतापगढी यांनी ते घ्यावे म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळेल, असा टोला त्यांना लगावला आहे. इम्रान प्रतापगढी यांचे क्वालिफिकेशन काय, असा सवालही त्यांनी केला. सोनिया गांधी यांच्यावर कोणाचातरी दबाव आहे, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, लोकशाही टिकून राहण्यासाठी, काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असून पक्ष सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.