AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज ठाकरे यांच्या व्हिजनची महाराष्ट्राला गरज’, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील वाढती जवळीक चर्चेचा विषय बनली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तरीही मनसेने १०० पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या विरोधात माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी "राज ठाकरे यांच्या व्हिजनची महाराष्ट्राला गरज", असं बावनकुळे म्हणाले आहेत.

'राज ठाकरे यांच्या व्हिजनची महाराष्ट्राला गरज', चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान
चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे
| Updated on: Nov 01, 2024 | 4:05 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यातील जवळीक आता वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून मतदारांच्या समोर जात आहेत. तर विरोधी पक्षातील प्रमुख तीन पक्ष हे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत. दुसरीकडे मनसे पक्षाकडून 100 पेक्षा जास्त जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि विरोधातील महाविकास आघाडी या दोघांच्या समोर आपले उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत वेगवेगळी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुसरीकडे आपण निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्तेत राहू आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलं आहे. विशेष म्हणजे भाजपकडूनही राज ठाकरे यांच्या बाजूने प्रतिक्रिया देण्यात येत असल्याचं चित्र आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची महाराष्ट्राला गरज असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात आपले पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण शिवसेनेचे सदा सरवणकर हे तिथे विद्यमान आमदार आहेत. तसेच सदा सरवणकर हे आपला दावा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या जागेबाबतचा वाद निर्माण झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे अर्ज मागे घेतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हा निर्णय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाने करायचा आहे. कारण ती जागा शिंदे यांना गेलीय. ती जागा भाजपकडे असती तर आम्ही एका मिनिटात निर्णय केला असता. आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाची राज्याला गरज आहे. महाराष्ट्राला त्यांच्या व्हिजनची गरज आहे. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने अमित विधानसभेत आला तर फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

नवाब मलिक यांच्याबद्दल बावनकुळे काय म्हणाले?

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजप सोबत नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली, त्यावर आम्ही ठाम आहोत. नवाब मलिक यांचा प्रचार करण्याचा संबंध येत नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. आम्ही आमचा निर्णय सांगितला. आम्हाला ते पटणारं नाही. आम्ही महायुतीत त्यांना सांगितलं होतं. पण त्यांचा निर्णय त्यांनी घेतला आता त्या मतदारसंघात आमचा निर्णय आम्ही घेतलाय”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. “खोटं आता चालणार नाही. फक्त यांच्याकडे तोंडाच्या वाफा आहे. आमच्याकडे विकास आहे. तोडाच्या वाघांनी महाराष्ट्र चालत नाही. तोडांच्या वाफांनी महाराष्ट्र चालत नाही. ते विचलीत झाले आहेत. त्यांची मानसिक स्थिती खालावली आहे. ९०-९०-९० करत त्यांचा गोंधळ झाला आहे. हा तमाशा आता पटत नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.