आधी बावनकुळेंचा ओबीसी आरक्षणासाठी, आता खासदार महात्मेंचा धनगर आरक्षणासाठी आघाडीला अल्टिमेटम; भाजप आक्रमक होतेय?

| Updated on: Aug 08, 2021 | 4:31 PM

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षणासाठी डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. (dhangar reservation)

आधी बावनकुळेंचा ओबीसी आरक्षणासाठी, आता खासदार महात्मेंचा धनगर आरक्षणासाठी आघाडीला अल्टिमेटम; भाजप आक्रमक होतेय?
vikas mahatme
Follow us on

नागपूर: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षणासाठी डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर आरक्षणासाठी भाजपला अल्टिमेटम दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही विकास महात्मे यांनी दिला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक होत असल्याची जोरदार चर्चा आहे. (bjp mp vikas mahatme ultimatum maha vikas aghadi over dhangar reservation)

खासदार विकास महात्मे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने हा इशारा दिला आहे. एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 650 जागा घोषित करण्यात आल्या आहेत. मात्र यात एनटी (क )वर्गासाठी फक्त 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नियमानुसार 3.5 टक्के म्हणजे किमान 23 जागा एनटी (क) वर्गासाठी आरक्षित असायला पाहिजे होत्या. मात्र, धनगर समाजाच्या 21 जागा गिळंकृत करून ठाकरे सरकारने धनगर समाजावर अन्याय केला आहे, असं सांगतानाच या निर्णयामुळे धनगर समाजात मोठा रोष निर्माण झाला असून हा अन्याय दूर झाला नाही तर धनगर समाज संघर्ष समिती राज्यभरात आंदोलन करेल, असा इशारा महात्मे यांनी दिला आहे.

बावनकुळेंचा इशारा

दरम्यान, या आधी सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. कायम केंद्राकडे बोट दाखवायच काम आता महाविकास आघाडीला करता येणार नाही. केंद्रानं आता राज्याला सर्वाधिकार होते, दिले आहेत आणि राहतील अशी व्यवस्था केलीय. फडणवीस सरकारनं आरक्षण दिल आणि टिकवूनही दाखवलं होतं. या सरकारला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचचं नाहीये. आता जे विधेयक पास होईल त्यानंतरही जर दुर्लक्ष झालं तर आम्ही गप्प बसणार नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासाठी आम्ही महाविकास आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम देत आहोत. जर आरक्षण दिल नाही, समाजाला न्याय दिला नाही तर राज्यातल्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. (bjp mp vikas mahatme ultimatum maha vikas aghadi over dhangar reservation)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात घडवायचीय; नितेश राणेंचा हल्लाबोल

प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’चे शिलेदार मखराम पवार यांचे निधन

सोनेरी नीरजचं मोदींबद्दलचं ‘ते’ ट्विट 2 वर्षानंतर लोकांच्या हाती लागलंच, ज्यात तो म्हणाला होता……
(bjp mp vikas mahatme ultimatum maha vikas aghadi over dhangar reservation)