VIDEO: पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात घडवायचीय; नितेश राणेंचा हल्लाबोल

राज्यात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली. निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे. (nitesh rane slams maha vikas aghadi government over ganesh festival restrictions)

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती होती, तशीच परिस्थिती ठाकरे सरकारला महाराष्ट्रात घडवायचीय; नितेश राणेंचा हल्लाबोल
nitesh rane


मुंबई: राज्यात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली. निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे, असं सांगतानाच ममता बॅनर्जी यांनी जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण केली. तिच परिस्थिती ठाकरे सरकारला राज्यात घडवायची आहे, असा घणाघाती हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी चढवला आहे. (nitesh rane slams maha vikas aghadi government over ganesh festival restrictions)

राज्य सरकारने गणेशोत्सवा संदर्भात नियम जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने जारी केलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करतानाच मागण्यांचं निवेदन राज्यपालांना दिलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्वच हिंदू सणांवर नियोजितपणे निर्बंद कसे टाकायचे यावर ठाकरे सरकारने भर दिला आहे. विविध सणांवर निर्बंध लावून सणाचे महत्व कसं कमी करायचं हाच किमान समान कार्यक्रम ठाकरे सरकारचा राहिला आहे. असंच दिसतंय. गणेशोत्सावासाठी जी नियमावली काढली, ती गेल्यावर्षीचीच आहे. फक्त तारीख बदललीय. या नियमावलीत सण साजरा करू नये असे नियम टाकले आहेत. गणेशोत्सवातील उत्साहाचं वातावरण मुंबईत असायचं. त्याला नियोजितपद्धतीने संपवायचं काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप राणे यांनी केला.

हिंदू खतरे में है

जे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करत आहेत. तेच काम उद्धव ठाकरे महाराष्ट्र आणि मुंबईत करत आहेत. हिंदू खतरे में है अशी परिस्थिती बंगालमध्ये होती. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात घडवण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. याबाबतची माहिती राज्यपालांना दिली आहे. त्यावर राज्यपालांनी तुम्ही तुमचं काम करा, मला काय करायचं ते मी करतो, असं आश्वासन दिलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

तिथे कोरोना दिसत नाही का?

या वर्षी सरकारने अति केलं आहे. घरात असलेल्या मूर्त्या सहा इंच करा आणि त्याचं विसर्जन करण्यासाठी पालिकेचे लोकं घरी येणार असल्याचं नियमावलीत म्हटलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या मिरवणुकाही बंद करण्यात आल्या आहेत. हिंदू सणांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या सरकारला कोरोना आठवतो. काल बेस्टचा कार्यक्रम झाला. तिथे गर्दी होती. मुख्यमंत्रीही तिथेच होते. ती गर्दी दिसली नाही. मेट्रोच्या कार्यक्रमातील गर्दी दिसली नाही. पार्ट्या चालतात तेव्हा कोरोना दिसत नाही. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन झालं, तिथे कोरोना दिसला नाही. पण जिथे जिथे हिंदूंचे सण येतात तिथे तिथे या सरकारला कोरोना कसा दिसतो?, असा सवालही त्यांनी केला.

होर्डिंगवरही निर्बंध

होर्डिंगवर गणेशोत्सव मंडळाचं आर्थिक गणित मांडलेलं असतं. त्या होर्डिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. होर्डिंग लावल्यावर कोणता कोरोना पसरतो? आणि कोणत्या कंपाऊडरने त्यांना सांगितलं याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी अन्य धर्मीयांचे सण झाले. पण त्या धर्माचे लोकं राज्यपालांना भेटले नाहीत. कारण त्यांच्यावर निर्बंध नव्हते. सर्व निर्बंध हिंदूंनाच लागू होतात. हे कुठे तरी बंद झालं पाहिजे, अशी मागणी राज्यपालांना केली आहे. ठाकरे सरकार हिंदूमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

बाळासाहेबांचा करारीपणा घेऊन या

यावेळी त्यांनी तेजस ठाकरे यांना राजकारणात येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेजस ठाकरे राजकारणात येत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. ठाकरे कुटुंबातून कोणी राजकारणात येत असेल तर बाळासाहेबांचा आवाज आणि करारीपणा घेऊनच त्याने यावं अशी अपेक्षा आहे. अगोदर अपेक्षा भंग झाला आहे. पण लहान भावाने तरी अपेक्षाभंग करू नये, असं टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांची तुलना व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुलना का केली हे त्यांनाच विचारा. भावाला शुभेच्छा दिलाय की भावांमध्ये वाद निर्माण केला हेच कळत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. (nitesh rane slams maha vikas aghadi government over ganesh festival restrictions)

संबंधित बातम्या:

भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत; चंद्रकांत पाटील म्हणाले…

प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’चे शिलेदार मखराम पवार यांचे निधन

पतीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पत्नीने बळजबरी तरुणीचे केस कापले

(nitesh rane slams maha vikas aghadi government over ganesh festival restrictions)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI