Nagpur Accident : कारने चार दुचाकींना उडवले, विचित्र अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी

नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला आहे.  कारचालकाने चार दुचाकींना मागून धडक दिली. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.

Nagpur Accident : कारने चार दुचाकींना उडवले, विचित्र अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी
| Updated on: Sep 10, 2022 | 8:22 AM

नागपूर :  नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात (Accident) झाला आहे.  कारचालकाने चार दुचाकींना मागून धडक दिली. या भिषण अपघातामध्ये (Car Accidents)  दुचाकीस्वार उड्डाण पुलावरून खाली फेकल्या गेले. या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू  झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक दारू  पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.भरधाव गाडी नियंत्रणात न आल्याने हा अपघात (Accident)झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये दुचारीसोबतच कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

दोन जणांचा मृत्यू

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  नागपूरच्या सक्करदरा पुलावर हा अपघात झाला आहे. पूलावरून जाणाऱ्या चार दुचाकींना मागून येणाऱ्या एका भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकींचा जागीच चुराडा झाला. दुचाकीवर असलेल्या वक्ती पुलावरून खाली पडले. या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच अपघात झाला त्यावेळी चारचाकी चालक दारू पेऊन गाडी चालवत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.