वैयक्तिक टीका करू नका अन्यथा…; चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला विरोधकांना हा इशारा

काही कार्यकर्ते ॲानलाईन पक्ष प्रवेश करणार आहेत. विकास आघाडीचे १० नगरसेवक मंगळवारी भाजपात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वैयक्तिक टीका करू नका अन्यथा...; चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला विरोधकांना हा इशारा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 10:57 AM

नागपूर : आज वाशिममध्ये २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, राज्यात प्रत्येक बुथवर २५ कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश करणार आहेत. राज्यभर एक लाख बुथवर २५ लाख कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. ३० तारखेला १०० वी मनकी बात करणार तेव्हापर्यंत हे नवीन कार्यकर्ते भाजपात येणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले. काही कार्यकर्ते ॲानलाईन पक्ष प्रवेश करणार आहेत. विकास आघाडीचे १० नगरसेवक मंगळवारी भाजपात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचं व्यक्तिमत्त्व हसरं

एकनाथ शिंदे पडले होते, की हसले होते, याबाबत तेच सांगू शकतात. एकनाथ शिंदे साहेबांना कधी रडताना बघीतलं नाही. ते नेहमी हसत असतात. मुख्यमंत्र्यांचं व्यक्तिमत्त्व नेहमी हसरं आहे. आदित्य ठाकरे – एकनाथ शिंदे कधी भेटले. हसले की रडले माहीत नाही, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

खरी लोकशाही भाजपात

घरातलेच लोक पक्षात येत आहेत. देशातले १० पक्ष काढले तर घराणेशाही दिसते. त्यांचा मुलगा आणि त्यांचा पक्ष अशीच स्थिती आहे. आमच्या पक्षात कार्यकर्ता अध्यक्ष, पंतप्रधान होऊ शकतो. पक्ष आपल्या घरातून जाऊ देतंच नाहीत. खरी लोकशाही भाजपात असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

वैयक्तिक टीका केल्यास सहन करणार नाही

महाविकास आघाडीच्या सभेला कुणाचाही विरोध नाही. जागेचा निर्णय त्यांनी घ्यायला हवा. विरोधकांनी पक्षीय धोरणावर बोलावं. पण वैयक्तिक टीका केली, नेत्यांचा अपमान केला तर आम्ही सहन करणार नाही. तुम्ही राज्याबद्दल बोला. वज्रमुठ घ्या किंवा कुठलीही मुठ घ्या, असं बावनकुळे यांनी म्हंटलं.

माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. १२ कोटी जनतेचे ते सेवक आहेत. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो काही झालं असेल, तर त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुख्यमंत्री यांनी सर्वांकडे लक्ष दिलं पाहिजे. हा माणुसकीचा धर्म आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मदतीवर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिला.

Non Stop LIVE Update
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.