Nagpur city | नागपूर शहरातील नद्यांसह, नाल्यांची सफाई; 46 किमीच्या 3 नद्या, 227 नाले कसे स्वच्छ करणार?

| Updated on: May 28, 2022 | 6:10 PM

नाग नदी 17.4 किमी, पिवळी नदी 16.4 किमी आणि पोहरा नदी 13.12 किमी असे तीनही नद्यांचे एकूण 46.92 किमी पात्र स्वच्छ करायचे आहेत. शहरात एकूण 227 नाले आहेत. नाल्यांच्या संदर्भात नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी राहू नयेत.

Nagpur city | नागपूर शहरातील नद्यांसह, नाल्यांची सफाई; 46 किमीच्या 3 नद्या, 227 नाले कसे स्वच्छ करणार?
नालेसफाईची पाहणी करताना मनपा आयुक्त.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : पावसाळ्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये. नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये. या उद्देशाने पावसाळ्यापूर्वी शहरातून वाहणाऱ्या नद्यांची व नाल्यांची स्वच्छता नागपूर महापालिकातर्फे करण्यात येते. या कामाची मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी (Radhakrishnan B) यांनी काल केली. स्वच्छता होत असलेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधला. आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारी (Citizens’ Complaints) तात्काळ दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. मनपातर्फे बारा एप्रिलपासून शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तीनही नद्यांसह नाल्यांची सफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीचे स्वच्छता कार्य प्रगतीपथावर आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नदी आणि नाल्याची सफाई पूर्ण करण्याचे प्रयत्न स्वच्छता विभागाचे (Sanitation Department) आहेत.

या भागांची आयुक्तांनी केली पाहणी

आयुक्तांनी महाराजबाग उद्यानातून वाहणारा नाला, वेस्टर्न कोलफिएल्डमधील विकासनगर नाला, फ्रेंड्स कॉलनी येथील नाला, झिंगाबाई टाकळी येथील एस.आर.ए. बिल्डिंगमधील पिवळी नदीचा भाग, मानकापूर सदिच्छा कॉलनी येथील नाला आणि राजपूत हॉटेल ते अशोक चौककडे वाहणारा नॉर्थ कॅनलची पाहणी केली. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पी.एच.ई.) विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांना स्वच्छतेसंदर्भात निर्देश दिले. पूल असलेल्या भागांमध्ये पूलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा आहे. तो तात्काळ काढण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले. फ्रेंड्स कॉलनीमधील साचलेला कचरा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. सदिच्छा कॉलनी आणि झिंगाबाई टाकळी येथे नागरिकांशी संवाद साधतांना मनपा आयुक्त यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

शहरात एकूण 227 नाले

नाग नदी 17.4 किमी, पिवळी नदी 16.4 किमी आणि पोहरा नदी 13.12 किमी असे तीनही नद्यांचे एकूण 46.92 किमी पात्र स्वच्छ करायचे आहेत. शहरात एकूण 227 नाले आहेत. नाल्यांच्या संदर्भात नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी राहू नयेत. नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकू नये या दृष्टीनं झोन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. नाले स्वच्छता कार्याला सुद्धा गती देण्याचे त्यांनी निर्देशित केले. शहरातील कोणत्याही नाल्यावर अस्वच्छता राहणार नाही. प्लास्टिक, कापड, थर्माकोल अशा वस्तूंमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी स्वच्छता केल्यानंतरही त्यात अस्वच्छता होऊ नये. यादृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, विजय हुमणे, झोनचे कार्यकारी अभियंता गिरीष वासनिक, उज्ज्वल धनविजय, विजय गुरुबक्षणी, झोनल स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा