AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Nagpur Water crisis | नागपुरात पाणीप्रश्नासाठी काँग्रेस आक्रमक, नेहरूनगर झोन कार्यालयावर हल्लाबोल; OCW चा निषेध

नागपूर महानगर पालिकेमध्ये OCW व भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे नागपूरमधील जनतेला या त्रासाला समोर जावे लागत आहे. जनता आता अधिक आक्रमक पवित्रा स्विकारेल. यापेक्षा तीव्र आंदोलन होणार असल्याचे गिरीश पांडव यांनी स्पष्ट केले.

Video Nagpur Water crisis | नागपुरात पाणीप्रश्नासाठी काँग्रेस आक्रमक, नेहरूनगर झोन कार्यालयावर हल्लाबोल; OCW चा निषेध
नागपुरात पाणीप्रश्नासाठी काँग्रेस आक्रमकImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 9:28 AM
Share

नागपूर : दक्षिण नागपूर येथील नेहरूनगर झोन कार्यालयावर (Nehru Nagar Zone) काल काँग्रेस (Congress) नेते गिरीश पांडव (Girish Pandav) यांनी शेकडो नागरिकांसोबत मटका फोड आंदोलन केलं. मागील काही वर्षांपासून नागपूरमधील जनता OCW च्या मनमानी कारभारामुळे व अवैध वसुलीमुळे त्रस्त झाली आहे. दक्षिण नागपूरमधील रहिवाशांना 30 मिनिटेसुद्धा पिण्याच्या पाण्याचे नळ येत नसल्यानं आक्रमक झाले. नळमुक्त नागपूर, टँकर मुक्त नागपूर झाल्याने व आवाजवी पाण्याच्या बिलाने जनता आता आक्रमक झाली आहे. 24 बाय 7 पिण्याचे पाणी येत असल्याची बाते करणारे खासदार व आमदार सपशेल जनतेशी खोटं बोलत आहेत. संपूर्ण नागपूर शहरांत 25-30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पिण्याचे पाणी येत नाही.

OCW च्या त्रासानं नागपूरकर त्रस्त

नागपूर महानगर पालिकेमध्ये OCW व भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे नागपूरमधील जनतेला या त्रासाला समोर जावे लागत असल्यानं जनता आता अधिक आक्रमक पवित्रा स्विकारेल. यापेक्षा तीव्र आंदोलन होणार असल्याचे गिरीश पांडव यांनी स्पष्ट केले. यावेळी सोबत राहुल अभंग, डुमदेव लांबाडे, अशोकराव वैद्य, किशोर शेगावकर, अरुण गायकवाड, नथुजी तितरमारे, प्रेम शंकर गिरडकर, सौरभ काळमेघ, खरकाटे साहेब, नलिनी ठाकूर, शालिनी वाडीभस्मे, वर्षा खळतकर, रोशनी अभंग, रश्मी गजापुरे सोबत परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ

धरणात पाणी, मग पुरवठा का नाही

ocw ही नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असल्याचा आरोप गिरीश पांडव यांनी केला. दक्षिण नागपूरच्या बऱ्याच भागात पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. पाण्याची बिल मात्र मोठ्या प्रमाणात वसूल केली जातात. गरजेनुसार पाणीपुरवठा करण्यात यावा. उन्हामुळं पाण्याचा वापर वाढला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आहे. मग, पुरवठा करणारी यंत्रणा कमी पाणी का पुरविते, असा सवाल करण्यात आला. नेहरू नगर झोनसमोर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.