NMC scam | मनपा स्टेशनरी घोटाळा : दोन अधिकारी निलंबित; सह्या कुणी केल्या?

बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, मागील काही वर्षांपासून ज्या कंपन्या साहित्याचा पुरवठा करीत आहेत त्यांच्या मागील पाच वर्षातील व्यवहाराची चौकशी केली जाणार आहे.

NMC scam | मनपा स्टेशनरी घोटाळा : दोन अधिकारी निलंबित; सह्या कुणी केल्या?
नागपूर महापालिकाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 8:50 AM

नागपूर : नागपूर मनपा स्टेशनरी घोटाळ्यात दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. मुख्य लेखा वित्त अधिकारी विजय कोल्हे (Vijay Kolhe) व सहायक आयुक्त महेश धामेचा (Mahesh Dhamecha) यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रकरणाची चौकशी सुरू असताना मनपाच्या स्थायी समितीनं दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे निलंबन (suspended) केले. समितीच्या बैठकीत सह्यांवरून आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांच्यात खडाजंगी उडाली. सह्या कोणी केल्या यावरून दोघांत चांगलाच वाद रंगला.

महापालिकेत गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्यात आजवर चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. शिवाय, मागील काही वर्षांपासून ज्या कंपन्या साहित्याचा पुरवठा करीत आहेत त्यांच्या मागील पाच वर्षातील व्यवहाराची चौकशी केली जाणार आहे.

निलंबनाचा निर्णय स्थायी समिती अध्यक्षांचा

महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिंटिंग साहित्यात 67 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या गुरुवारी याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शुक्रवारी यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. मनपातील कोट्यवधी रुपयांच्या या आर्थिक घोटाळ्यातत प्रथमदर्शनी प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा दोषी आढळत आहेत. त्यामुळं महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1971 अन्वये विभागीय चौकशी सुरू करण्यात यावी. संबंधित अधिकार्‍यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिले.

कंत्राटदाराने दिलेला धनादेश वटलाच नाही

महापालिकेच्या विविध विभागांना मनोहर साकोरे व त्यांच्या नातेवाईकांच्या फर्मच्या माध्यमातून स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. यात मनोहर साकोरे अँड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरुकृपा स्टेशनरी, एस. के. एंटरप्रायजेस व सुदर्शन आदी कंपन्यांचा समावेश आहे. स्टेशनरी घोटाळा उघडकीस आल्यानंतर 67 लाख व 54 लाख अशी एक कोटी 21 लाखांची रक्कम परत करण्यासाठी कंत्राटदाराने मनपाला धनादेश दिला. यात 54 लाखांचे धनादेश बँकेत वटलेच नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी पुन्हा प्रशासनाला कारवाई करावी लागणार आहे.

दोन कंत्राटदार, दोन कर्मचारी अटकेत

याप्रकरणी मनपातील प्रशांत भातकुलकर यांनी बोगस बिले सादर केल्याप्रकरणी एजन्सीचे मालक पद्माकर साकोरे, सुषमा साकोरे, मनोहर साकोरे, अतुल साकोरे या चौघांविरोधात मनपाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. शुक्रवारी अतुल मनोहर साकोरे व कोलबा जनार्दन साकोरे या दोघांना अटक करण्यात आली होती. तर रविवारी 19 डिसेंबरला मनपाच्या सामान्य प्रशासन विभागातील ऑडिटर अफाक अहमद आणि लिपिक मोहन रतन पडवंशी या दोघांना अटक करण्यात आली होती.

Nagpur Crime | आभासी जगात वावरू नका! फेसबूक फेंडने फसविले; आधी बलात्कार नंतर गर्भपात…

Nagpur Accident | लग्नात रस्त्यावर नाचताय सावधान! पाच वर्षीय चिमुकल्याला खासगी वाहनाने चिरडले

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.