Nagpur Crime | आभासी जगात वावरू नका! फेसबूक फ्रेंडने फसविले; आधी बलात्कार नंतर गर्भपात…

गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करायला लावला. तिला शेवटी त्याच्याविरोधात तक्रार करावी लागली. आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली.

Nagpur Crime | आभासी जगात वावरू नका! फेसबूक फ्रेंडने फसविले; आधी बलात्कार नंतर गर्भपात...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 10:15 AM

नागपूर : समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर वाढला. त्यामुळं आपण दुरच्याला जवळचे करतो. त्यात आपला घात होतो. अशीच एक घटना नागपुरात घडली. पतीपासून ती वेगळी राहत होती. फेसबूकवरून जळगावच्या आभासी मित्राच्या जवळ गेली. त्याने तिचे शारीरिक शोषण केले. गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करायला लावला. तिला शेवटी त्याच्याविरोधात तक्रार करावी लागली. आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली.

आधी चॅटिंग नंतर मिटिंग

जळगाव जिल्ह्यातील देवेंद्र विकास पवार ( वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. ३६ वर्षीय महिला जरीपटक्यात राहते. या महिलेचे १८ व्या वर्षी लग्न झाले. तिचा पती खाजगी वाहनचालक आहे. त्याच्यापासून तिला एक मुलगा व मुलगी आहे. पतीसोबत पटत नसल्याने ती मुलांना घेऊन वेगळी राहते. ती खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून काम करते. सप्टेंबर २०१७ मध्ये जळगावच्या देवेंद्रसोबत तिची फेसबुकवरून ओळख झाली. काही दिवस ऑनलाईन चॅटिंग झाले. त्यानंतर त्याने तिला भेटण्यासाठी जळगावला बोलावले. त्याला भेटण्यासाठी तिने नागपूर ते जळगावचा प्रवास केला. या संधीचा देवेंद्रने फायदा घेतला.

गर्भपात घडवून लग्नास नकार

लग्नाचे आमिष दाखवून देवेंद्रने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. आकर्षण अधिकच वाढू लागले. देवेंद्रही तिच्यासाठी नागपुरात आला. शताब्दी चौकात भाड्याची खोली घेतली. दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. २०१९ मध्ये पीडित महिला जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे राहायला गेली. तेथेही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिला देवेंद्रपासून गरोदर राहिली. तिने गर्भपात करण्यास नकार दिला. तरीही त्याने तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर देवेंद्रने लग्न करण्यास नकार दिला. म्हणून पीडितेने जरीपटका पोलिसांत तक्रार केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. एकीकडे नवरा सोडून गेला. दुसरीकडं आभासी मित्राने शोषण केले. त्यामुळं तिच्याकडं पश्चातापाशिवाय दुसरे काही राहिले नाही.

Nagpur Accident | लग्नात रस्त्यावर नाचताय सावधान! पाच वर्षीय चिमुकल्याला खासगी वाहनाने चिरडले

NMC Scam | स्टेशनरी घोटाळा, चौकशींचा ससेमीरा; कंत्राटदाराचे पेमेंट-मनपाच्या व्यवहारांची चौकशी होणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.