“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सीमाबांधवांवर लक्ष”; सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर ‘केंद्र’ अन्याय होऊ देणार नाही; या राजकीय नेत्याने भाजपचं गुणगान गायिले…

सीमावादावर राज्य सरकार गंभीर तर आहेच, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता बारकाव्याने याकडे लक्ष दिले असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सीमाबांधवांवर लक्ष; सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर 'केंद्र' अन्याय होऊ देणार नाही; या राजकीय नेत्याने भाजपचं गुणगान गायिले...
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 8:15 PM

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासून विरोधकांनी सीमाप्रश्नावर जोरदार आवाज उठविणार असल्याचा इशारा सरकारला दिला होता. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज सीमावादा सवाल उपस्थित करूनही सरकारकडून दुर्लक्षे केले जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना आमदार रवी राणा यांच्याकडून सीमावादाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत. तर याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

आमदार रवी राणा यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी उद्धव ठाकरे हे बेळगावला सीमावादासाठी किती वेळा गेले माहिती नाही असा सवाल उपस्थित करून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरला आले आहेत ते काही सीमावादासाठी नाही तर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षिततेसाठी ते नागपूरात आल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.

आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविषयी मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमाबांधवांकडे बारकाव्याने लक्ष आहे.

सीमावाद सोडवण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही हा सीमावाद सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे तर, केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबरोबरच बेळगावातील कोणत्याही नागरिकांवर नाही असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक प्रशासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्र शासित करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी त्यांच्यावर टीका करत, उद्धव ठाकरे यांनी ही मागणी करणे चुकीचे असल्याचे मतही त्यानी यावेळी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.