AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | गजानन उमाटे नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्यपदी; कुलगुरु डॉ. सुभाष चौधरींकडून निवड

गजानन उमाटे हे गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही माध्यमात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी गजानन यांची बोर्ड ॲाफ स्टडीजच्या (Board of Studies) सदस्यपदी निवड केली आहे. हा टीव्ही 9 मराठीचा सन्मान असल्याचं ते म्हणाले.

Nagpur | गजानन उमाटे नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्यपदी; कुलगुरु डॉ. सुभाष चौधरींकडून निवड
गजानन उमाटेImage Credit source: tv 9
| Updated on: Apr 19, 2022 | 2:39 PM
Share

नागपूर : टीव्ही 9 मराठीचे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ॲाफ स्टडीजच्या (Board of Studies) सदस्यपदी निवड करण्यात आलीय. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळाचा सदस्य म्हणून नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (Vice-Chancellor) डॉ. सुभाष चौधरी यांनी गजानन उमाटे यांची ही निवड केलीय. गजानन उमाटे (Gajanan Umate) गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही माध्यमात कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठात मास कॉमचा अभ्यासक्रम ठरविण्यात उमाटे यांना सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. अशावेळी टेलिव्हीजन माध्यमात त्यांनी जे काम केलंय, त्याचा फायदा विद्यापीठातील मास कॉमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. मुंबईतीलचं नव्हे तर राज्यभर आणि देशात परराज्यात जाऊन रिपोर्टिंगचा अनुभव गजानन यांनी घेतला.

टेलिव्हीजन माध्यमात गेल्या 15 वर्षांपासून

गजानन उमाटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील किन्हाळा येथे झाला. प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पदवीसाठी ते नागपुरात आले. बी. ए. इंग्रजी लिटरेचरमध्ये धरमपेठ महाविद्यालयातून उत्तीर्ण केलं. नागपूर विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बीएमसी उत्तीर्ण केलं. त्यानंतर पी.जी.साठी ते मुंबईतील भवन्स येथे गेले. टेलिव्हीजन मीडियामधून त्यांनी पीजी केलं. त्यानंतर सागर विद्यापीठातून मास्टर इन मास कॉम पूर्ण केलं. टेलिव्हीजन माध्यमात गेल्या 15 वर्षांपासून ते कार्यरत आहेत.

दक्षिण, उत्तरेतही रिपोर्टिंग

टेलिव्हीजन माध्यमात त्यांनी डेस्कवरही काम केलंय. मुंबईत काही वर्षे काम केल्यानंतर ते नागपूरला परतले. कृषी हा त्यांचा आवडता विषय. कृषीशी संबंधित बातम्या ते आवडीनं करतात. कारण वडील शेतकरी. अजूनही वडील गावात शेती करतात. नागपुरात त्यांनी टेलिव्हीजन माध्यमाला गती देण्याचं काम केलंय. नागपुरात काम करत असताना टीव्ही 9 मराठीनं त्यांना राज्याबाहेर रिपोर्टिंगसाठी पाठविलं. केरळमध्ये महापूर आला असताना तिथं जाऊन गजानन यांनी रिपोर्टिंग केलं. कारगील विजय दिन घटनास्थळी जाऊन रिपोर्टिंग केलं. कारगीलमध्ये नेमकं कुठं काय झालं होतं, याचं रिपोर्टिंग त्यांनी केलं होतं. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या वेळी दिल्लीत काय राजकीय हालचाली होत होत्या, त्याचंही रिपोर्टिंग गजानन यांनी केलंय.

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

Raj Thackeray Z plus Security : राज ठाकरेंना झेड प्लस की मुंबई पोलीसच सुरक्षा वाढवणार? गृहमंत्री वळसे-पाटील म्हणतात, कमिटी निर्णय घेईल

Heat wave in Vidarbha : विदर्भात उष्णतेची लाट; पुढील दोन दिवसांत तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.