“कर्नाटक काय सोन्याची नगरी नाहीय, तिथं गेल्यावर काय सगळचं मिळणार असं नाही”; ‘या’ मंत्र्यांनी सीमावादावर थेट पडदाच पाडला….

ज्या कर्नाटकातील 865 गावांनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी संघर्ष केला आहे तरीही त्या गावांना अजून यश आले नाही. तर जतमधील गावांना लगेच कसं यश येणार असा सवालही सुरेश खाडे यांनी केला आहे.

कर्नाटक काय सोन्याची नगरी नाहीय, तिथं गेल्यावर काय सगळचं मिळणार असं नाही; 'या' मंत्र्यांनी सीमावादावर थेट पडदाच पाडला....
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 5:11 PM

नागपूरः महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी ठराव पास केल्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह त्यांनी विरोधकांचेही अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची सीमाप्रश्नी काय भूमिका आहे हे ही सुरेश खाडे यांनी आज स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी म्हैसाळ योजना आता कशा पद्धतीने अंमलात आणली जाणार आहे त्याचीही माहिती त्यांनी सांगितली.

ज्या सांगलीतील जत तालुक्यामधील 40 गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाला कळवल्यानंतर त्या गावांबरोबर चर्चा करून त्यांना सोयीसुविधा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

त्यामुळे ज्या कर्नाटकातील 865 गावांनी महाराष्ट्रात येण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी संघर्ष केला आहे तरीही त्या गावांना अजून यश आले नाही.

त्यामुळे जत तालुक्यातील ज्या गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला होता, तो काही एक दोन दिवसामध्ये लगेच मंजूर केला जाणार नाही. आणि कर्नाटक काय सोन्याची नगरी नाहीय, तिथं गेल्यावर काय सगळच मिळणार असंही नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

जत तालुका नेहमीच दुष्काळग्रस्त राहिला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पाण्यासाठी वेगवेघगळ्या योजना राबवण्याचं काम जाते आहे. जत तालुक्याला दुष्काळाची मोठी झळ बसत असल्याने 2 हजार कोटीची पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे.

त्यामुळे ही गावं कर्नाटकात जाण्याचा तर प्रश्न आता येणार नाही. तरीही दुष्काळ पट्ट्यातील गावांसाठी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यात राबवण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.