AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha Temperature | विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचा पारा 44.8 अंशावर; उन्हाळा पक्ष्यांच्या जीवावर

अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात 28 ते 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारचा दिवस ब्रम्हपुरीसाठी सर्वाधित तापमानाचा ठरला. 45.1 अंश तापमानाची नोंद झाली.

Vidarbha Temperature | विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचा पारा 44.8 अंशावर; उन्हाळा पक्ष्यांच्या जीवावर
नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पक्षी उपचारासाठी Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 9:39 AM
Share

नागपूर : नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट आलीय. नागपूरचा पारा 44.8 अंशावर पोहचलाय. यंदाचा उन्हाळा पक्ष्यांच्या जीवावर उठतोय. नागपुरात वाढत्या तापमानाचा पक्ष्यांना उष्माघात (Birds Heatstroke) झालाय. 100 पेक्षा जास्त पक्ष्यांवर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (Transit Treatment Center) उपचार सुरू आहेत. वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांची शक्ती कमी होत आहे. प्राण्यांमध्ये उष्माघातासारखा (Heatstroke) त्रास वाढलाय. नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दररोज सात ते आठ पक्षी उपचारासाठी येतात. पाळीव आणि जंगली प्राण्यांनाही उच्च तापमानाचा फटका बसतोय. भटकी जनावरे, श्‍वान, माकड आणि पक्षीही उष्माघाताचे शिकार होताहेत. उष्णतेमुळे सध्या पक्ष्यांना यांना मोठ्या प्रमाणावर अतिसाराची समस्या सुरू झालीय. खार, कोतवाल, चिमण्यासह इतरही पक्ष्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झालेत.

विदर्भात पारा भडकला

अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात 28 ते 30 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारचा दिवस ब्रम्हपुरीसाठी सर्वाधित तापमानाचा ठरला. 45.1 अंश तापमानाची नोंद झाली. वर्ध्यात 45 अंश सेल्सिअस, तर नागपुरात 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा प्रथमच नागपूरचे तापमान 44.5 अंशांच्या पुढं गेलंय. चंद्रपूर 44.6, तर अकोल्यात 44.7 अंश तापमान नोंदविले गेले. गोंदियात 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

रुग्णवाहिका चालकानं पोपटास पाजले पाणी

वाशिमहून रुग्ण घेऊन अकोल्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना रुग्णवाहिकेच्या समोर अचानक एक पोपट आला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून रुग्णवाहिका थांबवली. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपण मुक्या पक्ष्यांचा तर जीव घेतला नाही ना ही भावना प्रारंभी त्यांच्या मनात आली. पोपट जखमी झाला का हे पाहण्यासाठी रुग्णवाहिकेतील चालक आणि डॉक्टर भर उन्हात बाहेर आले. गाडीखाली आलेल्या पोपटाला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. एखाद्या रुग्णाप्रमाणे पोपटाची तपासणी केली. पाणी पाजले, रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाच्या निंबोळ्या खायला देऊन थोड्या वेळाने त्या मुक्या जिवाला शेजारील लिंबाच्या झाडावर सोडून दिले.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.