शिक्षकांचा मार पडला अन् भाषणं द्यायला लागलो; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

| Updated on: Sep 05, 2021 | 2:16 PM

आज शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. शिक्षकांच्या मारा मुळे भाषण द्यायला लागलो. (how i become speaker, nitin gadkari remember school day)

शिक्षकांचा मार पडला अन् भाषणं द्यायला लागलो; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा
nitin gadkari
Follow us on

नागपूर: आज शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. शिक्षकांच्या मारा मुळे भाषण द्यायला लागलो. शिक्षकांचा मार पडला नसता तर भाषण द्यायला शिकलो नसतो, असं नितीन गडकरी म्हणाले. (how i become speaker, nitin gadkari remember school day)

नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात शिक्षण आणि शिक्षक यावर भाष्य केलं. शिक्षणातून मानवाचं जीवन बदलत असतं. देशाला महासत्ता बनवायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. शिक्षक-पालक मॅनेजमेंट विद्यार्थी हा एक परिवार आहे आणि या परिवारात ऐक्य असेल तर चांगले विध्यर्थी घडले. त्याचा देशाला फायदा होईल, असं गडकरी म्हणाले.

कोणीही शंभर टक्के परिपूर्ण नसतो

आपल्या देशातील कुटुंब पद्धती ही संस्कारी आहे. पाश्चात्य देशात ते पाहायला मिळत नाही. सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं यात मोठा फरक आहे. त्यामुळे सुशिक्षित बनत असताना सुसंस्कृत बनणं महत्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोणीच 100 टक्के परिपूर्ण असू शकत नाही. कितीही चांगला माणूस असला तरी त्यात काही न काही गुणदोष असतातच. गुणदोष कमी करण सातत्याने करण्याची गरज आहे. आपण सोडून जाऊ तेव्हा आपल्या कार्याची स्तुती होणं महत्वाचं आहे, असं ते म्हणाले.

नागपूर प्रदूषण मुक्त करायचंय

ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणापासून नागपूरला मुक्त करून प्रदूषण मुक्तीत एक नंबरवर आणायचं आहे. रुग्णवाहिका, पोलीस गाडीवर सुमधूर हॉर्न असला पाहिजे. इतर वाहनांना भारतीय संगिताचा हॉर्न करण्याची तयारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संजय दत्तने घेतली भेट

दरम्यान, अभिनेता संजय दत्तने आज गडकरींची भेट घेतली. विदर्भात फिल्मसिटी उभारण्यासाठी संजय दत्तने गडकरींची भेट घेतल्याचं सांगण्यात येतं. संजय दत्तने अचानक नागपूर दौरा केल्यामुळे विदर्भात फिल्मसिटी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासून रखडले आहे. त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर संजय दत्त याने नागपूर दौरा केल्याचं बोललं जातं आहे. या दौऱ्यात गडकरी आणि नितीन राऊत यांच्यासारख्या दोन पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या. याशिवाय, संजय दत्तने शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचीही पाहणी केल्याची माहिती आहे.

जूनमध्येही नितीन राऊतांची भेट

दरम्यान, नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी जाऊन जून महिन्यात संजय दत्तने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती. नितीन राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतली होती. डॉ. नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले. मात्र 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित स्वागत समारंभ कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळेस कुणालाही लग्नाला उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते. (how i become speaker, nitin gadkari remember school day)

 

संबंधित बातम्या:

संजय दत्त नागपुरात नितीन गडकरींच्या भेटीला, कारण काय?

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

…आणि संजय दत्त अचानक मंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला नागपूरच्या घरी

(how i become speaker, nitin gadkari remember school day)