AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि संजय दत्त अचानक मंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला नागपूरच्या घरी

नितीन राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे (Sanjay Dutt meets Nitin Raut)

...आणि संजय दत्त अचानक मंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला नागपूरच्या घरी
नितीन राऊत कुटुंबीयांच्या भेटीला संजय दत्त
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 7:32 AM
Share

नागपूर : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांची भेट घेतली. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी संजयने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली. राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. (Bollywood Actor Sanjay Dutt meets Congress Leader Nitin Raut Family Son Kunal Raut at Nagpur)

डॉ. नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले. मात्र 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित स्वागत समारंभ कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळेस कुणालाही लग्नाला उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते.

कुणाल-आकांक्षा यांची भेट

संजय दत्तने शनिवारी अचानक नागपूरला जाऊन नवदाम्पत्याची भेट घेतली. कुणाल आणि आणि त्यांची पत्नी आकांक्षा यांना संजयने विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. या छोटेखानी भेटीत त्याने राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. संजय दत्तची ही नागपूर भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

संजय दत्तचे पिता अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसचे माजी खासदार होते. तर त्याची मोठी बहीण प्रिया दत्तनेही काँग्रेसकडून खासदारकी भूषवली आहे. त्यामुळे दत्त कुटुंबीयांचे काँग्रेस नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

नितीन राऊतांच्या मुलाचा विवाह

नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपण सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुनच मुलाचे लग्न करणार असल्याचं नितीन राऊत यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार 19 फेब्रुवारीला त्यांच्या मुलाचा विवाह पार पडला. पण या विवाहानिमित्त 21 फेब्रुवारीला आयोजित स्वागत समारोह सोहळा स्थगित करुन राऊत यांनी सामाजिक भान राखलं.

“आपणांस ह्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. तरी हे निमंत्रण रद्द समजण्यात यावे आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपण कृपया आम्हाला सहकार्य करावे ही नम्र प्रार्थना. आपणांस होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही व्यक्तिशः दिलगीर आहोत.” असं पत्रक राऊत यांनी काढलं

संबंधित बातम्या :

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!

(Bollywood Actor Sanjay Dutt meets Congress Leader Nitin Raut Family Son Kunal Raut at Nagpur)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.