संजय दत्त नागपुरात नितीन गडकरींच्या भेटीला, कारण काय?

संजय दत्तने अचानक नागपूर दौरा केल्यामुळे विदर्भात फिल्मसिटी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासून रखडले आहे. त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

संजय दत्त नागपुरात नितीन गडकरींच्या भेटीला, कारण काय?
Sanjay Dutt Nitin Gadkari

नागपूर : विदर्भात चित्रपटनगरी सुरु करण्याच्या प्रयत्नांना जोर येताना दिसत आहे. प्रख्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरमध्ये चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री,  काँग्रेस नेते आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांचीही भेट घेतली. यावेळी राऊत आणि संजय दत्त यांनी रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी केल्याची माहिती समोर येत आहे.

संजय दत्तने अचानक नागपूर दौरा केल्यामुळे विदर्भात फिल्मसिटी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासून रखडले आहे. त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर संजय दत्त याने नागपूर दौरा केल्याचं बोललं जातं आहे. या दौऱ्यात गडकरी आणि नितीन राऊत यांच्यासारख्या दोन पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या. याशिवाय, संजय दत्तने शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचीही पाहणी केल्याची माहिती आहे.

जूनमध्येही नितीन राऊतांची भेट

दरम्यान, नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी जाऊन जून महिन्यात संजय दत्तने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती. नितीन राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतली होती.

डॉ. नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले. मात्र 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित स्वागत समारंभ कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळेस कुणालाही लग्नाला उपस्थित राहणे शक्य झाले नव्हते.

कुणाल-आकांक्षा यांची भेट

संजय दत्तने सहा जून रोजी अचानक नागपूरला जाऊन नवदाम्पत्याची भेट घेतली होती. कुणाल आणि आणि त्यांची पत्नी आकांक्षा यांना संजयने विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या होत्या. या छोटेखानी भेटीत त्याने राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या होत्या. संजय दत्तची ही नागपूर भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

संजय दत्तचे पिता आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसचे माजी खासदार होते. तर त्याची मोठी बहीण प्रिया दत्तनेही काँग्रेसकडून खासदारकी भूषवली आहे. त्यामुळे दत्त कुटुंबीयांचे काँग्रेस नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

संबंधित बातम्या :

ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं सामाजिक भान, कोरोनामुळे मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित

…आणि संजय दत्त अचानक मंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला नागपूरच्या घरी

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI