पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या; दारुच्या व्यसनामुळे पती पत्नीत वाद

| Updated on: May 16, 2022 | 7:22 PM

पत्नीने घटस्फोट घेऊन माहेरी गेल्यानंतर तो अत्यंत नैराश्येत होता. दरम्यान या महिन्यात 22 रोजी त्याच्या घटस्फोटीत पत्नीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न होणार होते. त्याच नैराश्यतून त्याला हे दुःख सहन झाले नाही.

पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या; दारुच्या व्यसनामुळे पती पत्नीत वाद
शेतकरी आत्महत्या
Image Credit source: tv9
Follow us on

भंडारा : पत्नी (Wife) सोडून गेल्याच्या नैराश्यातून पतीने (Husband) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्देवी घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्याच्या मांढळ येथे घडली आहे. गज्जू यादवराव वहिले (वय 35 वर्ष, राहणार मांढळ) असे मृताचे नाव आहे. गज्जूचे 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते, मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होती. त्या भांडणाला कंटाळून आणि पतीच्या त्रासामुळे 4 महिन्यापूर्वीच त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळेच तो प्रचंड नैराश्येत होता. या नैराश्येतूनच त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

पत्नीने घटस्फोट घेऊन माहेरी गेल्यानंतर तो अत्यंत नैराश्येत होता. दरम्यान या महिन्यात 22 रोजी त्याच्या घटस्फोटीत पत्नीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न होणार होते. त्याच नैराश्यतून त्याला हे दुःख सहन झाले नाही.

रात्री उशिरा आत्महत्या

रविवारी गावातील तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरात कार्यक्रम आटोपून आल्यावर त्याने उशिरा रात्री घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी उशीर झाला तरी आपल्या मुलाने दरवाजा का उघडला नाही म्हणून आईने गज्जूच्या घरी जाऊन बघितले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मोहाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही केली.

पत्नीचा विरह सहन झाला नाही

गज्जूने पत्नीच्या विरहामुळे आत्महत्या केली असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. गज्जूला दारुचे व्यसन असल्यामुळे त्याची आणि पत्नीची वारंवार भांडण होत होती. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही तो दारुच्या आहारी गेला होता. पत्नी माहेरी गेल्यानंतर तो आणखी तणावात होता. त्यामुळे तो आणखी जास्त दारुच्या आहारी गेला होता, त्याला अनेकांनी समजून सांगितल्यानंतरही त्याने कुणाचे ऐकले नव्हते. त्याच नैराश्येच्या गर्तेत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.