Nagpur Yuva Sena | नागपुरात वरुण सरदेसाईंनी फुंकले युवा सेनेत प्राण, विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचं दिलं टार्गेट

युवा सेनेने विदर्भकडे लक्ष केंद्रित करत नागपुरात युवा सेनेचा निश्चय मेळावा युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे. युवा सेनेला विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचं टार्गेट देण्यात आलं. तर युवा सेनेची फौज तयार करा. त्यासाठी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आणखाणार असल्याचे संकेत सरदेसाई यांनी दिले.

Nagpur Yuva Sena | नागपुरात वरुण सरदेसाईंनी फुंकले युवा सेनेत प्राण, विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचं दिलं टार्गेट
नागपुरातील युवा सेनेच्या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 4:28 PM

नागपूर : युवा सेनेने विदर्भकडे लक्ष केंद्रित करत नागपुरात युवा सेनेचा निश्चय मेळावा (Nishchay Melawa) युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारलाय. युवा सेनेला विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचा टार्गेट देण्यात आलंय. युवा सेनेची फौज तयार करा त्यासाठी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आखणार असल्याचे संकेत दिले. नागपूरसह विदर्भात शिवसेना आणि युवा सेनेचं पाहिजे त्या प्रमाणात प्रस्थ नाही. मात्र आता युवा सेना कामाला लागली आहे. नागपुरात भरगच्च असा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून युवा सेनेत जोश फुंकण्याचं काम वरुण सरदेसाई यांनी केलं. मुंबई विद्यापीठात ज्याप्रमाणं युवा सेनेने इतिहास रचला, तोच इतिहास आता विदर्भातील विद्यापीठात (University of Vidarbha) रचायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागा अशा सूचना करण्यात आल्या. राज्यभरात युवा सेनेची फौज तयार करण्यासाठी राज्य स्तरावर सदस्य नोंदणी ( Member Registration) कार्यक्रम राबविण्यास लवकरच सुरवात करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. अनेक निवडणूक आपण युतीत भाजपसोबत होतो म्हणून गांभिर्याने घेतल्या नाही. पण आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्या निवडणुका आपल्याला गांभिर्यानं घ्यायच्या आहेत.

महागाई वाढली आता शांत का

वरुण सरदेसाई म्हणाले, भाजपला देशात एकहाती सत्ता मिळाली. तेव्हा आपण सोबत होतो. मात्र आता त्या पक्षाने विकास तर काय काहीच केलं नाही. मात्र ते काही अजेंडा राबवतात, असा टोला भाजपला लगावला. महाविकास आघाडी सरकारने चांगलं काम केलं याचा दाखला अनेक एजन्सींनी ने दिलं. सर्वात चांगले मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव पुढं आलंय. मुख्यमंत्री सहायता निधी सगळ्या पक्षांनी दिला. मात्र भाजपने तो निधी राज्य सरकारकडे न करता पीएम सहायता निधीमध्ये दिला. असं हे महाराष्ट्रद्रोही आहेत. महागाई विरोधात काँग्रेसच्या काळात भाजप नेते रस्त्यावर उतरत होते. मात्र आता शांत बसले. केंद्र सरकार अपयशी ठरलं.

आदित्य ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

संजय राऊत यांचा गुन्हा काय हे कोणालाच सांगता येत नाही. मी सांगतो त्यांचा गुन्हा काय. संजय राऊत यांनी भाजप चे 105 घरी बसवले. हा गुन्हा केला म्हणून त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. आदित्य ठाकरे एवढ्या कमी वयात कॅबिनेट मंत्री म्हणून जे काम करत आहे त्याचं कौतुक आंतरराष्ट्रीय स्थरावर होत आहे. युवकांची मोठी फौज उभी करायची आहे. त्यासाठी राज्य स्थरीय सदस्य नोंदणी करायची आहे, असंही सरदेसाई यांनी यावेळी सांगितलं.

Nagpur IPS woman officer : धक्कादायक ! नागपुरात आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण, चोरीही, पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे

Congress: काँग्रेसच्या असंतुष्टांची नाना पटोलेंवरच भडास?; डिनर डिप्लोमसीत ‘खाना’खराबा?

Nagpur Suicide | मृत्यूनंतरच्या जगाचं आकर्षण, नागपुरात 13 वर्षांच्या बलिकेची आत्महत्या

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.