AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | परदेशी प्रवासी आल्यास मनपाला कळवा, चाचणी करून घ्या-प्रशासनाचं आवाहन

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला सीरो सर्व्हेचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. यात शहरातील 84 टक्के तर ग्रामीण भागातील 75.92 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडी तयार झाल्याचं पुढे आलंय. शहर आणि ग्रामीण भागात मिळून सुमारे 80 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडी तयार झाल्या आहेत.

Nagpur Corona | परदेशी प्रवासी आल्यास मनपाला कळवा, चाचणी करून घ्या-प्रशासनाचं आवाहन
राम जोशी, अतिरिक्त आयुक्त मनपा
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 4:13 PM
Share

नागपूर : परदेशातून प्रवासी नागपुरात आल्यास प्रशासनाला कळवा, असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय. जिनोम सिक्वेंसिंगची तपासणी करण्यासाठी नमुने पुणे तसेच हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. परंतु, अद्याप एकही ओमिक्रानचा रुग्ण आढळून आला नसल्याचं मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कळविलंय.

80 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडीज

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला सीरो सर्व्हेचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. यात शहरातील 84 टक्के तर ग्रामीण भागातील 75.92 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडी तयार झाल्याचं पुढे आलंय. शहर आणि ग्रामीण भागात मिळून सुमारे 80 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडी तयार झाल्या आहेत. शहरातील दहा झोनमध्ये धंतोली झोनमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. ग्रामीण भागातील पारशिवनी तालुका सर्वाधिक प्रभावित झाल्याचे पुढे आलंय.

6 हजार 100 जणांचे नमुने घेतले

जिल्ह्यातील 6 हजार 100 जणांचे नमुने घेतले होते. तिसर्‍या सर्वेक्षणात महापालिका हद्दीतील 10 झोनमधील प्रत्येकी 4 वॉर्डातील एकूण 3 हजार 100 तर ग्रामीणच्या 13 तहसीलमधून प्रत्येकी 1 मुख्यालय व प्रत्येक तहसीलमधील दोन गावातून एकूण 3 हजार नमुने गोळा केले. यासाठी 6 ते 12, 12 ते 18, 18 ते 60 आणि 60 हून अधिक अशा वयोगटाचे चार गट तयार करण्यात आले होते. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. संजय जोडपे यांच्या मार्गदर्शनात मेडिकलमध्ये पीएसएम विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार यांच्या नेतृत्वात ही तपासणी करण्यात आली.

दिवसभरात १९ कोरोना बाधित

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी एकूण १९ बाधितांची भर पडली. यात शहरातील १६, ग्रामीण भागातील २ तर जिल्ह्याबाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदाच १९ रुग्णांची नोंद झाली. यात शिवाजीनगरातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे. कोरोनाचे दुहेरी सावट असताना नागरिकांमध्ये सतर्कता दिसून येत नाही. शहरातील बाजारपेठा, लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांमध्ये नागरिक विनामास्क मुक्तसंचार करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळताना दिसून येत नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असंही मनपा प्रशासनाच्या वतीनं कळविण्यात आलंय. जिल्ह्यात दिवसभरात २ हजार ९४१ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी मंगळवारी १९ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आढळून आले. तर दिवसभरात जिल्हय़ातून केवळ २ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले.

Nagpur Municipal Corporation | ओबीसी इच्छुकांची चिंता वाढली, दावेदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता

MLC Election | 10 डिसेंबरला मतदान, तीन उमेदवारांचे भाग्य ठरविणार 560 मतदार

Nagpur Crime | कौटुंबिक कलह घेऊन पोहोचला ठाण्यात, तिथेच ह्रदविकाराच्या झटक्यानं युवकाचा मृत्यू

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.