‘त्या’ धमकीच्या फोनने सर्वांच्या काळजात धस्स; नितीन गडकरी यांना ‘या’ राज्यातून धमकीचा कॉल; तुरुंगात बंद असलेल्या…

कांताने गडकरी यांना धमकीचा कॉल का केला? त्यामागचं कारण काय? कुणाच्या सांगण्यावरून हा कॉल करण्यात आला? तुरुंगातूनच कॉल का केला?

'त्या' धमकीच्या फोनने सर्वांच्या काळजात धस्स; नितीन गडकरी यांना 'या' राज्यातून धमकीचा कॉल; तुरुंगात बंद असलेल्या...
nitin gadkari Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 7:30 AM

नागपूर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना काल अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देणारा फोन केला होता. राजकारणातील अजातशत्रू असलेल्या गडकरी यांना धमकावणारा फोन आल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झाले अन् एकच खळबळ उडाली. सर्वांशी चांगले संबंध असणाऱ्या गडकरी यांना कोण धमकी देऊ शकतं? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला गेला. कदाचित हा फेक कॉल असून कोणी तरी खोडसाळपणा केला असावा असा कयासही वर्तवला गेला. पण हे सर्व अंदाज खोटे ठरले आहेत. गडकरी यांना एका खतरनाक गुंडाने धमकावणारा कॉल केला असून तो कर्नाटकातील एका तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं उघडकीय आल्याने पोलीस यंत्रणेच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

जयेश कांता असं या गँगस्टरचं नाव आहे. तो कर्नाटकाच्या बेळगावमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यानेच नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकावणारा फोन केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार गडकरी यांना तुरुंगातूनच धमकी दिली जात होती.

हे सुद्धा वाचा

हत्येचा आरोपी

जयेश कांता हा कुविख्यात गँगस्टर आहे. हत्येच्या प्रकरणात तो शिक्षा भोगत आहे. त्याने तुरुंगातून अवैधरित्या फोनचा वापर करून गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन केल्याचं नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

या प्रश्नांचा खुलासा हवा

कांताने गडकरी यांना धमकीचा कॉल का केला? त्यामागचं कारण काय? कुणाच्या सांगण्यावरून हा कॉल करण्यात आला? तुरुंगातूनच कॉल का केला? फोन करण्यासाठी कुणाचा मोबाईल वापरला होता? त्याला गडकरी यांच्या कार्यालयाचा नंबर कसा मिळाला?

कुणी हा नंबर आणून दिला का? यासह असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नागपूर पोलीस आता बेळगावच्या तुरुंगात जाऊन कांता याची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

डायरी जप्त

दरम्यान, बेळगाव जेल प्रशासनाने कांताकडून एक डायरी जप्त केली आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीसाठी प्रोडक्शन रिमांड मागितली आहे. आरोपीचा अधिक तपास करण्याची गरज आहे. त्यासाठी त्याला महाराष्ट्रात आणण्याची गरज आहे, असं नागपूर पोलिसांनी सांगितलं.

तीन कॉल

दरम्यान, या धमकीच्या फोननंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गडकरी यांच्या कार्यालयात सकाळी 11.25 आणि 11.32 वाजता धमकीचे फोन आले होते. त्यानंतर 12.32 वाजताही एक कॉल आला होता.

एकूण तीन कॉल गडकरींच्या कार्यालयात करण्यात आले. त्यामुळे आरोपीचे कॉल डिटेल रिकॉर्ड तपासले जाणार असून त्याचं अॅनालिसिस केलं जाणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.