Chandrapur Crime | कौन बनेगा करोडपतीच्या लॉटरीचे आमिष; चंद्रपुरात कशी होतेय ग्राहकांची फसवणूक?

चंद्रपुरातील मोबाईलधारकांना कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागल्याचे मेसेज येतात. त्यानंतर लॉटरीच्या लालसेने बँक खात्याचे डिटेल्स देणाऱ्यांची फसवणूक होते. अनेकजण लुटले गेल्यावर ग्राहक पंचायतीच्या तक्रारीनंतर पोलीस सक्रिय झालेत.

Chandrapur Crime | कौन बनेगा करोडपतीच्या लॉटरीचे आमिष; चंद्रपुरात कशी होतेय ग्राहकांची फसवणूक?
चंद्रपूर पोलीस ठाणे
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 12:47 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील मोबाईलधारकांना कौन बनेगा करोडपतीच्या (Who will become a millionaire) नावाने बनावट फोन येतात. व्हॉट्सॲप मॅसेज, ऑडिओ क्लिप (WhatsApp messages, audio clips) पाठविली जात आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाखांची लॉटरी आपणास लागली असे सांगितले जाते. त्या लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी बॅंक अकाऊंटचा तपशिल मागविला जातो. सोबतच इतर अत्यावश्यक माहिती मागविली जात आहे. या माहितीच्या आधारावर बँकेतील रक्कम लंपास केली जात असल्याची प्रकरणे उघडकीस आलीत. याची तक्रार ग्राहक पंचायतीकडं (Complaint Consumer Panchayat) करण्यात आली. त्यानंतर पोलीस सक्रिय झाले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

25 लाखांची लॉटरी लागल्याचे मेसेज

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, भद्रावती, चंद्रपूर शहरातील तिघे अशा प्रकारात लुटल्या गेले आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित या प्रकाराला बळी पडले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या नावाने ऑनलाईन लुटमारीचे प्रकार चंद्रपुरात घडू लागले आहेत. 25 लाखांची लॉटरी लागली, असा मेसेज अथवा भ्रमणध्वनी धडकतो. लालसेपोटी लुटमारीचा खेळ सुरू होतो. या प्रकाराने डोकं वर काढताच पोलीस दक्ष झालेत. कुणाकुणाची फसवणूक झाली याची चौकशी सुरू आहे. हे चोर कशाप्रकारे फसवितात. याचा तपास आता सायबर पोलिसांना करावा लागणार आहे. ग्राहकांनी सावध असले पाहिजे, अशं आवाहन आता पोलीस करत आहेत.

भावनेच्या आहारी जाऊ नका

पोलिसांनी शहरात बॅनर लावून या प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन केले. असा मेसेज तुम्हालाही आला असेल तर दुर्लक्ष करा. भावनेच्या आहारी गेलात तर लुटीला बळी पडालं, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. हा प्रकार लक्षात येताच भद्रावती ग्राहक पंचायतने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती चंद्रपूर शहरपोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी दिली. मला लॉटरीचे पैसे मिळतील म्हणून भावनेच्या आहारी जाऊ नका, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन आता पोलीस करत आहेत. त्यामुळं सावध होण्याची वेळ आली आहे.

Nagpur Pollution | नांदगाव येथील राखेचे प्रदूषण कमी होणार काय?; आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक, टि्वटवरून दिली माहिती

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.