Nagpur Crime | नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत आली, त्याने तिचा उपभोग घेतला; लग्नास नकार दिल्याने तिने घेतली पोलिसांत धाव…

Nagpur Crime | नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत आली, त्याने तिचा उपभोग घेतला; लग्नास नकार दिल्याने तिने घेतली पोलिसांत धाव...
प्रातिनिधिक छायाचित्र.

ती त्याच्यासाठी पतीला सोडून आली. मौजमजा केली. त्याच्यापासून गरोदर राहिली. तरीही तिच्याशी तो लग्न करत नव्हता. म्हणून पीडित युवतीनं पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 29, 2021 | 4:11 PM

नागपूर : ही घटना आहे सक्कारदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. लग्न झाल्यानंतर दोन वर्षे संसार केला. पण, त्यानंतर त्याच्यात तिला काही रस वाटला नाही. दरम्यान, दुसरा तरुण तिच्या जीवनात आला. ती त्याच्यासाठी पतीला सोडून आली. मौजमजा केली. त्याच्यापासून गरोदर राहिली. तरीही तिच्याशी तो लग्न करत नव्हता. म्हणून पीडित युवतीनं पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली.

 

सुखी संसाराचा केला त्याग

संबंधित पीडित महिला ही 28 वर्षीय आहे. लग्न झाल्यानंतर दोन वर्षे पतीसह सुखी संसार केला. त्यानंतर पतीशी बिनसले. तरणाबांड युवक तिला गवसला. तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. ती पतीला सोडून युवकासाठी माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तिच्यावर वॉच ठेवणारा तिचा नवरा नव्हता. त्यामुळं शेख शहजाद याच्याकड कामावर असतानात तिने शरीरसंबंध प्रस्थापित केले. अविवाहित असलेल्या शेख शहजादने तिचा वापर केला. एक एप्रिल 2020 ते 30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याच्यापासून ती गरोदर राहिल्याच पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलंय.

 

लग्नासाठी पाहत होता मुली

पीडित महिलेने शहजादकडे वारंवार लग्नाचा तगादा लावला. परंतु, तो टाळाटाळ करीत होता. दरम्यान, शहजादच्या घरी त्याला बघायला स्थळे यायला लागली. त्यामुळे ती आणखी चिडली. तिने शहजादला गर्भवती असल्याचे सांगून लग्नाची गळ घातली. मात्र, त्याने नात्यातील मुलगी बघून लग्न करण्याचा निर्णय घेतला. 30 ऑक्टोबर रोजी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तरीही त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळं महिलेनं सक्करदरा पोलिस ठाण्यामध्ये बलात्कार केल्याची तक्रार दिली. सक्करदरा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू; अमरावतीत खळबळ

NMC scam : भाजपकडून का करण्यात येतेय तुकाराम मुंढेंच्या चौकशीची मागणी? स्टेशनरी घोटाळ्याशी मुंढेंचा संबंध!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें