AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंचितला सोबत घेण्याबाबत अशोक चव्हाण यांची काय भूमिका; टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया

Ashok Chavan on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दाव्यावर अशोक चव्हाण यांनी सविस्त भाष्य केलंय. वाचा...

वंचितला सोबत घेण्याबाबत अशोक चव्हाण यांची काय भूमिका; टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया
| Updated on: Dec 26, 2023 | 2:11 PM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर | 26 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत आघाडी केली आहे. या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे. विरोधी पक्षांच्या या आघाडीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडी सामील होण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रेसची भूमिका काय असेल. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीत येण्याला हिरवा कंदिल दाखवला आहे.

वंचितबाबत अशोक चव्हाण यांची भूमिका काय?

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तीगत पातळीवर सकारात्मक आहे, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. पण 29 तारखेच्या बैठकीत इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. त्यावेळेस वंचित बाबतंही चर्चा होणार आहे. 29 तारखेच्या बैठकीत वंचितला सोबत घेतल्यास किती जागा. द्यायच्या याबाबतंही चर्चा होणार आहे. वंचितला सोबत घेतलं तर राज्यातील मतांचं विभाजन टाळता येईल, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

खासदार प्रतापराव चिखलीकर यांची जागा डळमळीत आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत. सध्या मतदारसंघांचे सर्व्हे केले जात आहेत. त्यात चिखलीकर यांची जागाच धोक्यात आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत, असं म्हणत अशोक चव्हाण प्रतापराव चिखलीकर यांच्यावर पलटवार केला आहे.

प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दाव्यावर भाष्य

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला होता. त्यांचा हा दावा अशोक चव्हाण यांनी खोडून काढला आहे. खासदार प्रतापराव चिखलीकर यांची जागा डळमळीत आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत. सध्या मतदारसंघांचे सर्व्हे केले जात आहेत. त्यात चिखलीकर यांची जागाच धोक्यात आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत, असं म्हणत अशोक चव्हाण प्रतापराव चिखलीकर यांच्यावर पलटवार केला आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.