Nagpur Corona Update | नागपुरात कोरोनाचा हाहा:कार, आरोग्य यंत्रणेची झोप उडाली, उपचारासाठी नव्या डॉक्टरांची भरती

नागपुरात हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळत असल्यामुळे येथे नव्याने डॉक्टरांची भरती होणार आहे. (nagpur corona patients doctor recruitment)

  • Updated On - 10:25 pm, Tue, 30 March 21
Nagpur Corona Update | नागपुरात कोरोनाचा हाहा:कार, आरोग्य यंत्रणेची झोप उडाली, उपचारासाठी नव्या डॉक्टरांची भरती
सांकेतिक फोटो

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात तर ही स्थिती अतीशय गंभीर आहे. येथे रोज 50 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे. रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणासुद्धा अपुरी पडू लागली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता नागपुरात नव्याने डॉक्टरांची भरती होणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विशेषज्ञ डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. (Nagpur Corona patients increasing Municipal department will recruit new doctor)

नागपुरात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असले तरी, येथे संसर्गाची साखळी तोडण्यात यश येत नाहीये. त्यातही आता य़ेथे कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासू लागली आहे. ही सर्व परिस्थिती पहता येथे नागपूर मनपाने आणखी नव्या डॉक्टारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मानधन तत्वावर डॉक्टरांची नियुक्ती

नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विशेषज्ञ डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. एम.डी. पर्यंतचे शिक्षण असणाऱ्या डॉक्टरला अडीच लाख तर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झालेल्या डॉक्टरला एक लाख रुपये मानधन म्हणून देण्यात येणार आहेत. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या चर्चेनंतर डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे ‍निश्चित करण्यात आले आहे.

नागपुरात कोरोनाची स्थिती काय ?

दरम्यान, आज दिवसभ रातनागपुरात चौथ्या दिवशीसुद्धा मृतांचा आकडा 50 च्या पार गेला. येथे आद दिवसभरात कोरोनामुळे एकूण 54 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नव्या रुग्णांची संख्या मात्र थोडी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज नागपुरात दिवसभरात 1156 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 223153 वर पोहोचला आहे. तर येथे आतापर्यंत 5040 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

इतर बातम्या :

LIVE | कोल्हापुरात संभाजीनगर बस स्थानकाच्या रेकॉर्ड रूमला आग, वीस जवानांकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न

Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला काहीसा दिलासा, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण संकट मात्र कायम

बीएमसी प्रशासन दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जावू नये : महानगरपालिका आयुक्‍त चहल

(Nagpur Corona patients increasing Municipal department will recruit new doctor)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI