AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis| मोदी-शहांनी सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे; देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्षादेश महत्त्वाचा!

महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना फडणवीस म्हणाले, ' अडीच वर्ष अनाचार दुराचार भ्रष्टाचार होता. राज्यात गव्हर्नस नावाचं काम करत नव्हती.

Devendra Fadanvis| मोदी-शहांनी सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे; देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्षादेश महत्त्वाचा!
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 2:35 PM
Share

नागपूरः पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे. कारण माझ्यासाठी पक्षादेश सर्वोच्च स्थानी आहे. मी सरकारमध्ये बसणार नव्हतो. पण त्यांनी सांगितलं, तू तिथे जा. म्हणून मी उपमुख्यमंत्री झालो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली. उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच त्यांचे मूळ शहर नागपुरात (Nagpur Rally) दाखल झाले. भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी येथे त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून फडणवीसांचा विजयी रॅली काढण्यात आली. ढोला-ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी आज नागपूर दणाणून सोडलं. या विजयी रॅलीला संबोधित करताना फडणवीसांनी आपली इच्छा नसतानाही वरिष्ठांनी आदेश दिला म्हणून मी उपमुख्यमंत्री (Deputy CM) झालो, हे पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं. तसेच यावरून मी अजिबात नाराज नाही तर माझ्यासाठी पक्षादेश हा सर्वोच्च आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाविषयी बोलताना म्हणाले, ‘ मी ठरवलं होतं. मी सरकार बनविल पण सरकारमध्ये जाणार नाही. तशी घोषणा केली होती. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी माझं नाव अनाऊन्स केलं. जेपी नड्डा आणइ शहा बोलले. मोदींशी बोलल्यावर मी सहभागी झालो. शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. मोदी शहा नसते तर नागपूरचा माणूस कधीच मुख्यमंत्री झाला नसता. त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायला तयार आहे. पण त्यांनी तर माझा सन्मान केला. त्यांनी सांगितलं भाजपच्या संपूर्ण १०६ लोकांचं नेतृत्व तू करतोस. तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घे.आणि मी जबाबदारी स्वीकारली..’

मविआने बेईमानी केली होती…

2019 मधील निवडणुकांनंतर महाविकास आघाडीने बेईमानी केली, असा आरोप फडणवीसांनी नागपुरात बोलातना केला. ते म्हणाले, ‘ आपल्याशी बेईमानी झाली पाठीत खंजीर खुपसला गेला. आपला मॅनडेट पळवला गेला. जनतेचा कौल चोरीला गेला. पण चोरी गेलेला कौल पुन्हा एकदा आम्ही परत मिळवला आहे. हा तुमचा कौल आहे. ही तुमची मानसिकता आहे. या तुमच्या आमच्या आकांक्षा आणि अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना भाजप युतीचं नव्यानं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. एकनाथ शिंदे हे आपले मुख्यमंत्री आहेत. नागपूरचं शिंदे यांचं स्वागत ठाणे आणि मुंबईलाही ऐकायला गेलं पाहिजे. ‘

‘महाराष्ट्र विदर्भाला प्रगतीवर नेणारं सरकार’

महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना फडणवीस म्हणाले, ‘ अडीच वर्ष अनाचार दुराचार भ्रष्टाचार होता. राज्यात गव्हर्नस नावाचं काम करत नव्हती. अनेक राजे काम करत होते. कोण कुणाचं ऐकत नव्हतं. सामान्य माणसांचं कोणी ऐकत नव्हतं. त्यामुळे आपण शिवरायांचे वंशज आहोत. छत्रपतींनी जो गनिमी कावा सांगितला त्याच गनिमी काव्याने पण निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आलं. ‘

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.